नियमाला तिलाजंली देत निविदा प्रक्रियेचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:26+5:302021-06-03T04:10:26+5:30
अमरावती : नियमानुसार निविदा प्रक्रिया करणे अनिवार्य असताना खातेप्रमुखांना बाजूला ठेवत काही कर्मचाऱ्यांनी निविदा स्वत:च्या मर्जीने काढण्याचा प्रकार मिनीमंत्रालयात ...

नियमाला तिलाजंली देत निविदा प्रक्रियेचा खेळ
अमरावती : नियमानुसार निविदा प्रक्रिया करणे अनिवार्य असताना खातेप्रमुखांना बाजूला ठेवत काही कर्मचाऱ्यांनी निविदा स्वत:च्या मर्जीने काढण्याचा प्रकार मिनीमंत्रालयात सुरू असल्याची माहिती आहे.
निविदा कक्षात नियमित कर्मचाऱ्यांऐवजी बाहेरील व्यक्ती नियुक्त करण्यात आले आहे. त्यातूनच अनेक सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार कामाच्या प्रतीक्षेत असतानाच निवडक लोकांना कामे दिली जात असल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या नव्या कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर पारदर्शकता आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असतानाच त्यांना अंधारात ठेवत काही कंत्राटदारांशी मिलीभगत करत लाखो रुपयांच्या निविदा प्रक्रियेचा बोऱ्या वाजविला आहे. नियमानुसार तीन लाखाच्या वरील कामांसाठी ई निविदा प्रक्रिया करावी लागते. मात्र निविदा कक्षात नियमानुसार निविदा न काढता कर्मचाऱ्यांनी परस्परच निविदा प्रक्रियेचे बारा वाजविले आहेत.
कोट
आधीच कोरोनामुळे विकासकामे ठप्प झाली असून नवीन कामांसाठी निधी नाही. त्यातच मंजूर काही लहान मोठी कामे मिळावीत यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र, निविदा प्रक्रियेत केली जात असलेली मनमानीमुळे अन्याय होत आहे.
एक सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार