जुगार पकडला, सीपींच्या विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:41+5:302021-09-19T04:14:41+5:30
अमरावती: सीपींच्या विशेष पथकाने गाडगेनगर ठाणे हद्दीत कारवाई करून जुगार पकडला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. पोलिसांनी भीमनगरात जुगार ...

जुगार पकडला, सीपींच्या विशेष पथकाची कारवाई
अमरावती: सीपींच्या विशेष पथकाने गाडगेनगर ठाणे हद्दीत कारवाई करून जुगार पकडला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. पोलिसांनी भीमनगरात जुगार रेड केली असता, आरोपी सुभाष गोपाळराव पटके (५२, रा. रहाटगाव), प्रकाश ओंकार भाकरे (५५, रा. गाडगेनगर), अविनाश अशोक भुयार(३४, रा. भीमनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून वरील-मटका साहित्यासह ३०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली.
बाॅक्स:
अवैध दारूसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पथकाने कारवाई करून अवैध दारूसह, दुचाकी असा एकूण ७५,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राजापेठ ठाणे हद्दीतील सातुर्णा परिसरात करण्यात आली. आरोपी प्रज्वल छत्रपती बाबोळे (२८, रा. संजय गांधी नगर)याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. तो दारुची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आला.