देशी दारू विक्रीच्या दुकानावर चालला गजराज

By Admin | Updated: April 7, 2015 00:32 IST2015-04-07T00:32:59+5:302015-04-07T00:32:59+5:30

बडनेरा मार्गावर नवाथे स्थित नाल्याच्या काठावर असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाची अतिक्रमित भिंत व पायऱ्या

Gajraj goes to the country's liquor shops | देशी दारू विक्रीच्या दुकानावर चालला गजराज

देशी दारू विक्रीच्या दुकानावर चालला गजराज

नवाथे येथील घटना : महापालिकेची कारवाई
अमरावती :
बडनेरा मार्गावर नवाथे स्थित नाल्याच्या काठावर असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाची अतिक्रमित भिंत व पायऱ्या तोडण्यात आल्या. अचानक महापालिकेचा गजराज चालल्याने ते बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
नवाथे येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत परिसरातील नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी किशोर बोरकर यांनी हे दुकान हद्दपार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे.

नवाथे येथील देशी दारु विक्रीचे दुकान निकषात बसत नाही. शाळेच्या प्रवेशव्दारापासून ४५ मीटर अंतरावर आहे. नियमानुसार ५० मीटर अंतरावर असावे. त्यामुळे हे दुकान हद्दपार करावे.
- किशोर बोरकर,
कॉंग्रेस पदाधिकारी

Web Title: Gajraj goes to the country's liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.