पान ३ साठी
फोटो - पी ११ वरूड अतीक्रमण
वरूड : पालिका प्रशासनाने शुक्रवारीदेखील शहरातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला. पोलिसांच्या सहकार्याने गुरुवारपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रमुख चौक व बाजारपेठेतील अतिक्रमण दूर करताना पालिका व पोलिसांना फारसे सहकार्य मिळाले नाही.
शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस धडाक्यात सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यावर तसेच पादचारी मार्गावर अतिक्रमण काढणे आवश्यक होते. तक्रारी वाढल्या होत्या. मुनादी देऊन अतिक्रमणधारकांना वेळ देण्यात आला होता. मात्र, अतिक्रमण कायम असल्याने मोहिमेस सुरूवात करण्यात आल्याचे पोलीस व पालिकेने सांगितले.
--------