वरुडमध्ये अतिक्रमणावर चालविला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:13+5:302020-12-11T04:39:13+5:30
पान ३ साठी पोलीस, पालिकेची संयुक्त मोहीम : कारवाईत हवे सातत्य वरूड : शहरातील अतिक्रमणावर पालिकेने गुरुवारी गजराज ...

वरुडमध्ये अतिक्रमणावर चालविला गजराज
पान ३ साठी
पोलीस, पालिकेची संयुक्त मोहीम : कारवाईत हवे सातत्य
वरूड : शहरातील अतिक्रमणावर पालिकेने गुरुवारी गजराज चालविला. पोलिसांच्या सहकाऱ्याने ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्ते, ॲप्रोच रोड तसेच विश्रामगृह ते बसस्थानक, मुलताई चौक, पांढुर्णा चौक आणि जायंट्स चौक तसेच रिंग रोड परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.
शहरात अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारून पादचारी मार्गावर अतिक्रमण केले आहे. चहा, पानटपरी तसेच वाहन दुरुस्तीची गॅरेज राष्ट्रीय महामार्गावरच थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा यांनी वाहन पार्किंग आणि अतिक्रमणबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तत्पूर्वी नगरपरिषदेने दुकानदारांना नोटिससुद्धा बजावल्या. मुनादी देऊन सूचना देण्यात आली होती. परंतु अतिक्रमण जैसे थे च असल्याने अखेर गुरुवार सकाळपासून मुख्याधिकारी रवींद्र पाटील, ठाणेदार श्रेणिक लोढा, एपीआय संघरक्षक भगत, हेमंत चौधरी, उपमुख्याधिकारी गाडगेसह पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी जेसीबीने अतिक्रमण काढले.
--------