दुबार नावांच्या प्रकरणावरून गाजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:38+5:302021-06-29T04:10:38+5:30
आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी सभेत गरजले, नोंदणी अधिकाऱ्यांना धरले धारेवर मतदार यादी अपडेट करणे म्हणजे निवडणूक विभागाचे ...

दुबार नावांच्या प्रकरणावरून गाजली सभा
आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी सभेत गरजले, नोंदणी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
मतदार यादी अपडेट करणे म्हणजे निवडणूक विभागाचे केवळ "सोंग" - नितीन गवळी
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मतदारांसदर्भात स्थानिक तहसील कार्यालयात सोमवारी आयोजित सर्व राजकीय पक्षाची सभा दुबार नावांच्या प्रकरणावरून चांगलीच गाजली. आम आदमी पार्टीचे नितीन गवळी या सभेत चांगलेच गरजले व त्यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मतदार यादी अपडेट करणे म्हणजे निवडणूक विभागाचे केवळ "सोंग" आहे असा आरोपसुध्दा नितीन गवळी यांनी यावेळी केला.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघांतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील मतदारयादीत बरेचशे मतदारांचे छायाचित्रच नाही व अशा मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करून घेण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकार्ऱ्यां केले आहे. जे मतदार नमूद निवासी पत्त्यावर राहत नाही, अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० व मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयादीतून वगळण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. या विषयाबाबत चांदूर रेल्वे तालुक्याच्या सर्व राजकीय पक्षाची सभा २८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेला सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसीलदार मळसने यांची उपस्थिती होती.