शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६८९ गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई, ‘जीएडीए’चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:49 IST

राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्यात आॅगस्टनंतर पावसाने सरासरी पार केली असली तरी अमरावतीसह मराठवाडा विभागातील १४ तालुक्यांत मात्र, पाऊस माघारला. त्यामुळे ६८९ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत भूजलात कमी आलेली आहे. या सर्व गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई राहणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा (जीएसडीए) राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेण्यात आल्यानंतर हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा अहवाल मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आलेला आहे.राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे. या क्षेत्रात प्रचलित धोरणानुसार ३,९२० विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्याची भौगोलिकता, भूशास्त्रीय संरचना आणि दिवसेंदिवस वाढता भूजल उपसा लक्षात घेता पाणी पातळीची अचूक माहिती होण्याकरिता आता जलस्वराज प्रकल्पांतर्गत ३२ हजार ७६९ गावांतील विहिरींचा अभ्यास केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा संभाव्य पाणीटंचाई संदर्भातील अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना शनिवारी सादर करण्यात आला. यामध्ये १२,०१५ विहिरींच्या पाणी पातळीत तूट आढळून आली. यानुसार १२ तालुक्यांतील ३५९ गावांमध्ये जानेवारीपश्चात पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. ३३० गावांत एप्रिलपासून पाणीटंचाईचे संकट राहणार आहे.

पाणीटंचाईची कारणेपावसात खंड व यामुळे सिंचनासाठी भूजलाचा अमर्याद उपसा, सिंचनासाठी विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अतिउपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदींमुळे भूजलात कमी आलेली आहे व त्यामुळे सदर गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.जिल्हानिहाय संभाव्य पाणीटंचाईची गावेयामध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावे, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ४७ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, राळेगाव तालुक्यात ९ गावे, यवतमाळ तालुक्यात १४ गावे तसेच मराठवाड्यात लातूर तालुक्यात ८० गावे, देवाणी तालुक्यात २२ गावे, उदगीर तालुक्यात ८५ गावे, उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात ९७ गावे, पारंडा तालुक्यात ९५ गावे, परभनी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात ७६ गावे, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात ४२ गावे व नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती