शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम'ची सुरक्षा करतात ‘भावी अधिकारी’

By admin | Updated: May 30, 2015 00:32 IST

'काम असेल कठीण, नसते कधी अशक्य, पूर्णविरामानंतर संपते पूर्ण वाक्य, नशिबाला दोष देत, संधी गमवू नको, ..

जिद्द : नोकरी ती नोकरी अन् परीक्षेचा अभ्यासही!अमरावती : 'काम असेल कठीण, नसते कधी अशक्य, पूर्णविरामानंतर संपते पूर्ण वाक्य, नशिबाला दोष देत, संधी गमवू नको, काटेरी मार्ग असेल; पण ध्येय कधी सोडू नको.' या कवितेच्या ओळींना अनुसरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ध्येयवेडे तरुण 'एटीएम'वर सुरक्षारक्षकाची नोकरी करीत ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मी अधिकारी होणार या दृढ निश्चयाने हे भावी अधिकारी आपली ड्यूटी पूर्ण करताना ध्येयाकडे एक-एक पाऊल टाकीत आहेत. हे भावी अधिकारी आपल्या आर्थिक परिस्थितीशी झगडत भविष्याच्या वाटचालीसाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाला चांगले घर, आरामदायी जीवन, पैसे, चांगले मित्र आणि सहकारी मिळतील याची खात्री नसते. हे सत्य असले तरी आपण आपल्या कायार्तून हे चित्र बदलू शकतो, हेही तितकेच सत्य आहे. अनेक तरुण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे नोकरी करीत शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळावी म्हणून दिवसरात्र एक करीत अभ्यास करतात. असेच हे ध्येयवेडे तरुण विविध ठिकाणी एटीएममध्ये ड्यूटी करीत अभ्यास करताना दिसून येतात. एटीएमवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे तरुण पूर्वी कंपन्यांमध्ये काम करीत होते; पण कंपनीमध्ये १२ ते १४ तास राबावे लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकाच्या नोकरीला प्रधान्य दिले, असे या तरुणांनी सांगितले. शहरात विविध बँकांचे शेकडो एटीएम मशीन आहेत. चौकाचौकांत आणि रस्त्यांवर विविध बँकांचे एटीएम पाहावयास मिळतात. या एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी बँकांनी खाजगी सुरक्षा एजन्सीला दिलेली असते. या संस्थांच्या माध्यमातून एटीएमवर सुरक्षारक्षक नेमले जातात. बहुतांश एटीएमची जबाबदारी तरुणांवर सोपवलेली आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ आणि अथार्जन अशी दुहेरी उपलब्धी यातून होते. रात्रपाळीस प्राधान्यदिवसा नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करता येत नाही. रात्री एटीएमवर पैसे काढण्यासाठी जास्त नागरिक येत नाहीत. त्यामुळे आम्ही रात्रपाळीस अधिक प्राधान्य देतो. त्यामुळे अभ्यासही चांगला होतो, असे शहरातील एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. ६ ते ९ हजार पगारएटीएमवर सुरक्षारक्षक म्हणून दररोज आठ तास काम केल्यानंतर महिन्याला ६ ते ९ हजार रुपये पगार मिळतो. या पैशांतून रूम भाडे, महिन्याचा खर्च केल्यानंतर क्लासची फी, पुस्तकांची खरेदी करतो, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. विविध शाखांतील तरुणडिप्लोमा, अभियांत्रिकी, आर्टस्, सायन्स, कॉर्मस, कृषी अशा विविध शाखांतील पदवीधर मुले सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत. ज्या तरुणांकडे एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र आहे, अशा तरुण कॅडेटस्ना सुरक्षारक्षक म्हणून नेमताना प्रधान्य देतो, असे एका सुरक्षारक्षक एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले.