प्रहारच्या नगरसेवकांचे पाण्याच्या टाकीवर उपोषण
By Admin | Updated: December 22, 2014 22:39 IST2014-12-22T22:39:53+5:302014-12-22T22:39:53+5:30
येथील नगरपरिषदेचा कारभार फार ढेपाळला असून यावर कोणाचेही नियंत्रण नाही. विरोधी नगरसेवकांकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जात नसल्याने सत्तारुढ गटाच्या नगरसेवक गोपाल तिरमारे

प्रहारच्या नगरसेवकांचे पाण्याच्या टाकीवर उपोषण
चांदूरबाजार : येथील नगरपरिषदेचा कारभार फार ढेपाळला असून यावर कोणाचेही नियंत्रण नाही. विरोधी नगरसेवकांकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जात नसल्याने सत्तारुढ गटाच्या नगरसेवक गोपाल तिरमारे यांनीच प्रशासनातील अनियमितता व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला असून याच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन आठ दिवसांपूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी व आमदारांना दिले हाते. मात्र त्यावर कारवाई झाली नसल्याने यात सकाळी तिरमारे यांनी ग्रामीण रुग्णालयानजीकच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याला सात अनुकंपाधारकांनीही समर्थन देऊन उपोषण सुरू केल्याने या मागण्यांची गंभीरता वाढली आहे. उपोषणाची व आंदोलनाची दखल घेऊन नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, गटनेता अ. रहेमान, नगरसेवक जुलखाबी, शे. नजीर, एजाज खान, नितीन कोरडे आदींनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे गोपाल तिरमारे यांनी भूमिका घेतल्यामुळे आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदार दिलदार तडवी आंदोलन स्थळी पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे.
नायब तहसीलदार हरीशचंद्र राठोड, तलाठी बोकडे यांनी आंदोलनाची माहिती वरीष्ठांना सादर केली.
१९९५ पूर्वीचे अतिक्रमण नियमांकन करणे, पट्टे वाटप करण्यात आलेल्या झोपडपट्टीतील जागेची पालिकेत नोंद करणे, १९९५ पूर्वी पासून सरकारी जागे राहत असलेल्यांना समाज कल्याण घरकुलाचा लाभ द्यावा, अनुकंपधारकांना पालिका सेवेत समाविष्ट करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय रक्कम त्वरित द्यावी, वर्ग-३ ची पट्टे त्वरित भरावी, ५६ लक्ष रुपयांची मालमापक योजनेतील अनियमिततेची चोकशी करुन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, थकीत पाणी पट्टी व मालमत्ता कर, थकीत गाळा कर विभागाची ३ कोटी ४४ लक्ष रुपयांची त्वरित वसुली आणि मुख्याधिकाऱ्यांनी न घेता स्वत:च्या स्वाक्षरीचा धनादेश परीक्षण संस्थेला पाठविला याची चौकशी व्हावी, बेजाबदार मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन यादी मागण्यांचा पूर्ततेसाठी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी पाण्याचे टाकीवर बसून बेमुदत उपोषणला प्रारंभ केला आहे. त्यांच्यासमवेत कुंदन विंचुरकर, राजेश खोडपे, स्वप्नील काकडे, शुभम पांडे, चेतन चर्जन, सागर अंबाडकर, विनोद सुपरकर व विजय मोहोड हे देखील उपोषणात सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)