ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:49 IST2018-03-26T23:49:49+5:302018-03-26T23:49:49+5:30
शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने जिल्हाकचेरी व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहायक गटविकास अधिकारी पतंगराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मोर्चा
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने जिल्हाकचेरी व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहायक गटविकास अधिकारी पतंगराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मागील सात महिन्यापासून संगणक परिचालकांना वेतन मिळाले नाही ते त्वरीत देण्यात यावे, संग्राम प्रकल्पातील नियुक्ती न मिळालेल्या संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात सामावून घेण्यात यावे, माहे एप्रिल ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन लेखी पत्राव्दारे परिचालकांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ मनोहरे, सचिव राजेश कोयरे, उपाध्यक्ष सतीश सदार व परिचालक उपस्थित होते.