शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

अधिसंख्य पदास वारंवार मुदतवाढ; राज्य सरकारला वेतनापोटी बसतोय ६०० कोटींचा फटका

By गणेश वासनिक | Updated: October 15, 2022 18:06 IST

अभ्यास गटाच्या शिफारशी प्राप्त: निर्णय नाही, अधिसंख्य पदास पाचव्यांदा मुदतवाढ

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा निर्णय देऊनही अधिसंख्य पदे रद्द केले नाही. राज्य सरकार व मंत्रालयातील उच्च पदस्थ सनदी अधिकारी ‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी न करता न्यायालयाच्या निर्णयालाच वाटाण्याच्या अक्षदा दाखवून अधिसंख्य पदाला वारंवार मुदतवाढ देत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला अधिसंख्य पदांच्या वेतनापोटी दरवर्षी ६०० कोटींचा फटका बसत आहे.

राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिसंख्य पदावरील गैर आदिवासी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२ पुन्हा पाचव्यांदा ११ महिन्याची मुदतवाढ दिली आहे. बेकायदेशीर ठरलेल्या नियुक्त्यावर वेतनापोटी सर्व सामान्य, कष्टकरी, शेतकरी जनतेच्या करातून या मुदतवाढीने दरवर्षी ६०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्या जात असल्याचा आरोप ट्रायबल फोरमने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी निर्णय दिला असून जातीचा दावा अवैध ठरलेल्या व्यक्तींना दिलेले संरक्षण घटनेतील तरतुदींशी विसंगत ठरत असल्यामुळे अवैध ठरलेल्या व्यक्तींना कोणीही संरक्षण देऊ शकत नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण, न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता त्या पदांना संरक्षण दिले जात आहे. अभ्यास गटाचा अहवालावर निर्णय नाही

तत्कालीन मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती. या अभ्यास गटाने आपला अहवाल शासनास सादर केला. परंतु शासनाने अभ्यास गटाच्या शिफारशीवर अद्यापही अंतिम निर्णय दिला नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी मंत्र्यांच्या अभ्यास गटाला अडीच वर्षे लागली. आता शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत बनावट जातप्रमाणपत्रधारक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होतील, हे खरे आहे. 

बेकायदेशीर नियुक्त्यांना असे आहे संरक्षण

शासन निर्णय १५जून २०२०, २७ नोव्हेंबर २०२०, १७ फेब्रुवारी २०२१, २३ ऑगस्ट २०२१, २८ ऑक्टोबर २०२१ आणि आता शुक्रवारल १४ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली. हे पडद्याआडून संरक्षणच आहे.ज्यांच्या नियुक्त्याच बेकायदेशीर ठरविल्या आहे. अशा गैरआदिवासींना अधिसंख्य पदांवर नियुक्त करुन वारंवार मुदतवाढ देऊन पैशाची उधळपट्टी केल्या जात आहे. मात्र चार दशकापासून ज्या ख-या आदिवासींच्या जागा गैर आदिवासींनी बळकावल्या आहेत. त्या १२ हजार ५०० जागांची पदभरती करण्यासाठी शासनाचा विचारच नाही की आर्थिक अडचण आहे. 

- गंगाराम जांबेकर, महासचिव, ट्रायबल फोरम अमरावती

टॅग्स :Governmentसरकारjobनोकरी