शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:40 IST

अमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला.

गजानन मोहोडअमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकष बदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली. आता याच निकषान्वये राज्यातील ३०१ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने २०१८ मध्ये निवडणूक असलेल्या बाजार समित्यांच्या याद्या तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.पुणे बाजार समितीची निवडणूक यामध्ये विशेष चर्चिली जात आहे. या बाजार समितीचा कार्यकाळ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात आला; मात्र मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया रखडली होती. ८ आॅगस्ट २०१७ला निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविल्याने आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणुकीस पात्र असलेल्या अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येदेखील नव्याने मतदार याद्या करण्याची तयारी सुरू झालेली आहे.ज्या बाजार समित्यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी संपणार आहे, त्याचा अहवाल बाजार समित्यांच्या सचिवाला ३१ डिसेंबरपूर्वी राज्य सहकारी प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर प्राधिकरणद्वारा १५ दिवसांत निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांची यादी प्रसिद्ध करणार आहेत व त्याच तारखेला शेतकरी मतदारसंघासाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान यादीमध्ये १५ समान गण विभाजन करण्यात येणार आहेत व प्रत्येक गणातून एक जागा निवडण्यात येणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव जागा लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नावे शेतक-यांच्या वर्णक्रमानुसार राहणार आहे.यादीची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडेजी व्यक्ती १० आर शेतजमीन धारण करीत आहे व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे, अशा शेतकरी मतदारसंघाची गावनिहाय यादी संबंधित बाजार समितीच्या सचिवाला व जिल्हा निवडणूक अधिका-याला बाजार समितीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान १८० दिवस अगोदर प्राथमिक यादी देण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांची आहे. यानंतरच्या ३० दिवसांत सचिव प्रारूप मतदार यादी तयार करतील व ज्या शेतक-यांनी मागील पाच वर्षांमध्ये शेतमाल किमान तीन वेळा विक्री केला आहे, त्यांची नावे समाविष्ट करतील.उमेदवारीसाठी २१ वर्षांचा निकषजो शेतकरी संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात राहतो, त्याचे वय निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशी २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि त्याला जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी अधिनियमाद्वारे अपात्र केलेले नसावे व त्याचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट असावे, तीच व्यक्ती शेतकरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पात्र राहणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकAmravatiअमरावती