लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा (अमरावती): मध्यरात्रीनंतर राष्ट्रीय महामार्गावरील एका कॅटीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात केला. सोमवारी (दि. ६) मध्यरात्री एकनंतर नागपूर-अकोला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बडनेरानजीक एका अज्ञात वाहनाने चारचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात चक्काचूर झालेली चारचाकी कोलांट्या खात एका झाडावर आदळली. यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला. हे सर्वजण बडनेराच्या जुनी वस्ती परिसरातील आहेत.
मोहम्मद अनस मोहम्मद शाहीद (वय २२), मोहम्मद तलहा मोहम्मद अनिस (२२), मोहम्मद अवेज अब्दुल शकील (२१), अब्दुल अनवेज अब्दुल सलीम (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये मोहम्मद हुजेफा मोहम्मद अरिफ (२०), मोहम्मद अनस मोहम्मद अनिस (२०), मोहम्मद अशर इरशाद अहमद (२६) यांचा समावेश आहे. जुन्या वस्तीतील हे युवक सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मोहम्मद अशर याच्या कारने कॅटीनवर चहा पिण्यासाठी जात असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यालगतच्या काँक्रीट पिलरला धडकली व त्यानंतर कोलांट्या घेत झाडावर आदळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जागीच दगावलेल्या चौघांचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
जुन्या कब्रस्तानात अंत्यसंस्कार....
जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी सकाळी ११:३० वाजता चौघांचेही शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात नातेवाइकांची मोठी गर्दी जमली होती. रात्री ९ वाजता या चौघांचाही रेल्वे फाटकाजवळील जुन्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.
जुनी वस्तीत शोककळा; दुकाने बंद
मंगळवारी सकाळी ११ नंतर चौघांचेही मृतदेह घरी दाखल होताच शहरात शोककळा पसरली. जुन्या वस्तीतील मुस्लीमबहुल भागातील दुकानदारांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली. ते चौघेही शिक्षण घेत होते आणि सर्वजण अविवाहित होते.
Web Summary : Four college students died in a highway accident near Badnera after a truck hit their car. Two others were seriously injured. The group was heading to a canteen for tea when the accident occurred.
Web Summary : बडनेरा के पास राजमार्ग पर एक ट्रक ने कार को टक्कर मार दी, जिससे कॉलेज के चार छात्रों की मौत हो गई। दो अन्य गंभीर रूप से घायल हो गए। दुर्घटना के समय समूह चाय पीने के लिए एक कैंटीन की ओर जा रहा था।