चारचाकी अनियंत्रित दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:50+5:30
अर्पित कविटकर व राज पुरुषोत्तम खुळे (२४, दोघेही रा. चांदूरबाजार) असे मृतांची नावे आहेत. एमएच ४० केआर ७६४५ या क्रमांकाची चारचाकी चांदूर बाजारहून रिद्धपूरकडे येत असताना, वाहनाचा समोरचा टायर फुटला. त्याचवेळी एमएच २७ सीजे ९५३४ क्रमांकाच्या दुचाकीवर अनिकेत क विटकर व राज खुळे हे जात होते.

चारचाकी अनियंत्रित दुचाकीवरील दोघे ठार
रिद्धपूर : समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या चारचाकी वाहनावर दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. सोमवारी दुपारी ५ च्या सुमारास रिद्धपूरनजीकच्या खाऱ्या नाल्याजवळ हा अपघात घडला.
अर्पित कविटकर व राज पुरुषोत्तम खुळे (२४, दोघेही रा. चांदूरबाजार) असे मृतांची नावे आहेत. एमएच ४० केआर ७६४५ या क्रमांकाची चारचाकी चांदूर बाजारहून रिद्धपूरकडे येत असताना, वाहनाचा समोरचा टायर फुटला. त्याचवेळी एमएच २७ सीजे ९५३४ क्रमांकाच्या दुचाकीवर अनिकेत क विटकर व राज खुळे हे जात होते. काही कळायच्या आत दुचाकी त्या चारचाकी वाहनावर चढली आणि काही अंतरापर्यंत घासत गेली. यात अर्पितचा जागीच मृत्यू झाला, तर राजचा इर्विनमध्ये मृत्यू झाला. शिरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.