शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

-आता अधिग्रहित जमिनीचा चौपट आर्थिक मोबदला

By admin | Updated: April 1, 2017 00:20 IST

विविध प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळत होता.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता, पेढी प्रकल्पग्रस्तांना दिलासा अमरावती : विविध प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळत होता. याबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांसह महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिपाक म्हणून आता मुख्यमंत्र्यानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ चा गुणक देण्याला तत्वत: मान्यता दिली असून शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित जमिनींचा चौपट मोबदला मिळणार आहे. भातकुली तालुक्यातील २ हजार पेढी प्रकल्पग्रस्त कुटुंबांना यानिर्णयाचा आर्थिक लाभ होणार आहे. पालकमंत्री पोटे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीत महसूल व वनविभाग सचिवांना तसे निर्देश दिले आहेत. याबैठकीला पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वनविभगाचे प्रधान सचिव विकास खारगे, संबंधीत खात्यांचे अधीकारी तसेच पेढी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. भूसंपादन व पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क व अधीनियम २०१३ हा कायदा १ जानेवारी २०१४ पासून अंमलात आला आहे. त्यामध्ये कलम २६ व ३० या तरतुदीमध्ये जमिनीचा मोबदला ठरविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. अमरावती जिल्हा हा प्रादेशिक योजनेंतर्गत येत असल्यामुळे जमीन अधिग्रहण करताना १.५ गुणक वापरून शेतकऱ्यांना मोबदला मिळत होता. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक योजना लागू नसल्याने व तेथे २ हा गुणक लागू होत असल्याने तेथील शेतकऱ्यांना चौपट आर्थिक मोबदला मिळत होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होऊन त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत होते. याबाबत पेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व अन्य ग्रामस्थांनी अमरावती येथे पालकमंत्र्यांची भेट घेतली होती.त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी २ हा गुणक लागू करण्याचे आदेश संबंधीत विभागांना दिल्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा २ चा गुणक लागू होईल. त्यामुळे आता जमीन अधिग्रहणाचा चौपट मोबदला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्अळणगाव ग्रामस्थांची कैफियत भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पबाधित अळणगाव व लगतच्या अन्य ग्रामस्थांनी मंगळवारी अल्प मोबदल्याची कैफियत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे मांडली होती.त्याची दखल घेऊन पोटे यांनी तातडीने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानी घालून मंत्रालयात बैठक लावण्याचा शब्द पेढीबाधिताना दिला. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी अळणगाव येथील विजय दुर्गे, नरेंद्र वानखडे, धनराज खर्चान, महेंद्र राऊत, नारायण दुर्गे, सहदेव महिंगे आदींची उपस्थिती होती.