शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

परतवाडा-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM

परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते.

ठळक मुद्देअखेर भाग्य उजळले : गाव तेथे काँक्रीट रस्ता, ६०० कोटींचा प्रस्तावित खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या परतवाडा-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणास अखेर सुरुवात होणार आहे. येत्या वर्षभरात ६०० कोटी रुपये खर्चून हा महामार्ग चौपदरी होईल.परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते. त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम गत आठवड्यात पूर्ण झाले आहे. दिवाळीनंतर या कामाच्या निविदा काढण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चालविली आहे. त्यासाठी या एकूण ५४ किलोमीटर अंतराचा रस्त्यावर कुठे काय घ्यायचे, याचा आराखडा बनविला जात आहे. एकंदर येत्या सहा ते आठ महिन्यांत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहेया कामाला कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची वेळ आली. परिणामी उशिरा का होईना मात्र, वर्षाच्या शेवटी कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमरावती ते अचलपूर नाका, परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकपर्यंत सर्वेक्षण झाले होते. परंतु, धारणी, बऱ्हाणपूर, खंडवा या मार्गाचा विचार करता मल्हारानजीकच्या बुरडघाटपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नऊ किलोमीटर अंतराचा हा मार्ग अतिरिक्त समाविष्ट करण्यात आला आहे.अमरावती ते परतवाडापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम आता नऊ किलोमीट बुरडघाटपर्यंत वाढविले आहे. खासगी बँकेच्या अर्थसाहाय्याने काम होणार आहे. सर्वेक्षण झाले असून तपासणी होताच दिवाळीनंतर निविदा काढली जाईल. कोरोनामुळे कामाला विलंब झाला.- चंद्रकांत मेहत्रे,कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, अचलपूरखासगी बँकेच्या कर्जातून होणार रस्ताबुरडघाट परतवाडा-अमरावती या आंतरराज्यीय महामार्गासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असून खासगी बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर काम होणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरीकरणाचा राहणार आहे. वलगाव, आष्टी, पूर्णानगर, आसेगाव, बोरगाव पेठ, भूगाव आदी गाव तेथे काँक्रीटीकरण होईल. त्यामुळे एकूण ५४ किलोमीटरपैकी १० किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरणाचा राहणार आहे. रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआर सबमिशन झाले त्याची तपासणी होऊन दिवाळीदरम्यान निविदा निघण्याची शक्यता आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग