शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

रविवार ठरला अपघात वार; अमरावतीत दोन अपघातांत चिमुकल्यासह पाच ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 17:38 IST

अमरावती नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघाताच्या घटनेत सहाजण जागीच ठार तर, सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देप्रवासी वाहन-ट्रकची समोरासमोर धडकरहाटगाव रिंगरोडवरील घटना

अमरावती : रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी अपघात वार ठरला. अमरावती-नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये आठवर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

बडनेरानजीक अंजनगाव बारीहून शिरजगाव कसब्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी चारचाकी वाहन आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात प्रवासी वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास रहाटगाव रिंग रोडवरील एका हॉटेलसमोर हा भीषण अपघात घडला. त्यापूर्वी पहाटे ४.३० च्या सुमारास मालवाहू वाहन मागून ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. तो अपघात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. (six killed, seven injured in two accidents in Amravati)           

रहाटगाव रिंग रोडवरील हॉटेलसमोर घडलेल्या भीषण अपघातात रोशन रमेश आखरे (२६), प्रतिभा सुभाष पोकळे (५०, दोघेही रा. अंजनगाव बारी), कृष्णा सचिन गाडगे (८, रा. शिरजगाव कसबा) व गजानन संतोषराव दारोकार (४५, रा. जरुड) यांचा मृत्यू झाला. यातील रोशन हा वाहनचालक-मालक होता, तर जखमींमध्ये विजय भाऊराव पोकळे (५५), ललिता विजय पोकळे (५०), सुभाष भाऊराव पोकळे (६०) सुरेश भाऊराव पोकळे (५८, सर्व रा. अंजनगाव बारी), संगीता गजानन दारोकार (३५, रा. जरुड), रश्मी सचिन गाडगे (३५, रा. जरुड) व पिहू सचिन गाडगे (वय सहा महिने) यांचा समावेश आहे. जखमींना राजापेठ स्थित खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रकचालक पसार झाला.

घटनास्थळाचे चित्र अत्यंत भयावह

अंजनगाव बारी येथील पोकळे परिवारातील सदस्य शिरजगाव कसबा येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यासाठी त्यांनी गावातीलच रोशन आखरे या युवकाचे प्रवासी वाहन (एमएच २६ - एए ७९९९) ठरविले. रविवारी सकाळी १० च्या सुमारास या वाहनात बसून चालकासह ११ जण शिरजगाव कसब्याच्या दिशेने निघाले होते.

शहराबाहेरून जाणाऱ्या रहाटगाव रिंग रोडवर हॉटेलसमोर ते वाहन आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये (एमपी ०९ - ५५४९) समोरासमोर धडक झाली. या धडकेत प्रवासी वाहनाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. चौघे घटनास्थळीच दगावले. हा अपघात एवढा भीषण होता, की मृतांना ओढून बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे तथा एसीपी पूनम पाटील, प्रहारचे छोटू महाराज वसू यांनी पोहोचून बचाव कार्य केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूरAmravatiअमरावतीhighwayमहामार्ग