शहरात चार घरफोड्या कुख्यात चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरात शुक्रवारी एका चोराने चार घरे फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. चौथी चोरी ...

Four burglars arrested in the city for the notorious thief | शहरात चार घरफोड्या कुख्यात चोराला अटक

शहरात चार घरफोड्या कुख्यात चोराला अटक

ठळक मुद्देलाखोंचा मुद्देमाल जप्त । खोलापुरी गेट, राजापेठ हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात शुक्रवारी एका चोराने चार घरे फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. चौथी चोरी करताना तो भिंतीवरून रस्त्यावर कोसळल्याने नागरिकांच्या हाती लागला. राजापेठ पोलिसांनी शेख छोटू शेख दिलावर ऊर्फ ईल्ली (२७, रा. गेवराई पिंपळगाव, जि. बीड) या आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारा येथील रहिवासी आॅटोरिक्षाचालक सुरेश तुळशीराम करणे (६२) यांच्या पुतण्याला तिरूपतीला जायचे असल्याने त्यांच्या घराच्या चाब्या सुरेश करणे यांच्याकडे ठेवल्या होत्या. २३ डिसेंबरपासून या घराची देखरेख सुरेश करणे करीत होते. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ते आॅटोरिक्षा घेऊन बाहेर गेले. रात्री ८.३० वाजता परतले असता, दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरांनी बेडरूमधील दाराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची तक्रार खोलापुरी गेट पोलिसांत नोंदविली. याच हद्दीत साबणपुरा येथील रहिवासी शेख नजीर यांच्या घरातून चोरांनी ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ते अंत्यविधीसाठी बाहेर गेले होते.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोज कॉलनीत घरफोडीची तिसरी घटना घडली. शिवाजी गजानन मानकर (३९, रा. सरोज कॉलनी) हे शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले. सायंकाळी घरी परतले तेव्हा चोराने दाराच्या कुलपाचा कडीकोंडा तोडून कपाटातील ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे आढळून आले. घरफोड्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत.

वकील हरीश तापडियांकडे चोरी
देवरणकरनगरातील रहिवासी वकील हरीश तापडिया हे शुक्रवारी रात्री ९.०५ वाजता क्रांती कॉलनीतील मित्राकडे वास्तुशांती कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ९.४० वाजता त्यांना घराचे दार उघडे दिसले. त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, चोराने आतून दार लावून घेतले. त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना एकत्रित केले, दरम्यान चोराने त्यांच्या निवास्थानाच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर भिंतीवरून उडी घेताना रस्त्यावर कोसळला. त्याला नागरिकांनी चोप दिला. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख व सोन्याचे दागिने जप्त केले.

Web Title: Four burglars arrested in the city for the notorious thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर