Four bits of smoke on the 'Hilltop' | ‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ
‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ

अमरावती : चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. बिबट्यांनी गेल्या पंधरा दिवसात चार जनावरांवर हल्ला केल्याचे नागरिक सांगत असून, या घटनेविषयी वनविभाग गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे नागरिकांचा रोष वाढलेला आहे.
वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्पकडून चांदूर रेल्वेकडे जाणाऱ्या मार्गावर वैष्णोदेवी मंदिर असून, मंदिरासमोरच हिलटॉप कॉलनी आहे. विरळ वस्तीच्या या भागात जंगल आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर बिबट्यांचे दर्शन होते. मात्र, शुक्रवारी रात्री बिबट्याने काठोडे यांच्या गोठ्यातील गाईवर हल्ला चढवून गाईला ठार केले, तर एक गाय जखमी झाली. चार बिबट्यांनी गाईवर हल्ला करून तिला खेचत नेत असल्याचे नागरिकांनी पाहिले असून, घराची दारे बंद करून खिडकीतून हे दृश्य पाहिल्याचे नागरिक सांगत आहेत. वनविभागाने हालचाली टिपण्यासाठी शनिवारी गोठ्यात ट्रप कॅमेरा लावला आहे.
ये-जा करणाऱ्यांनो सावधान!
वडाळी व चांदूर ररेल्वे वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या मोठी आहे. वडाळीपासून चांदुरेल्वेकडे जाणाºया मार्गावर नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरु असल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आता आवश्यक झाले आहे.


Web Title: Four bits of smoke on the 'Hilltop'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.