शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

‘त्या’ मानवी तस्करीत उज्जैन, राजस्थानातून चौघे जेरबंद

By प्रदीप भाकरे | Published: March 20, 2023 5:55 PM

बालविवाहाचे कलम वाढविले : १.३० लाखांत अल्पवयीन मुलीची विक्री

अमरावती : येथील एका अल्पवयीन मुलीची परप्रांतात विक्री केल्याप्रकरणीच्या गुन्हयात गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातून एकाला तर राजस्थानातून तिघांना जेरबंद केले. ह्युमन ट्रॉफिकिंगच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणात या चार आरोपींची अटक शहर पोलिसांसाठी ‘मैलाचा दगड’ ठरली आहे. शहर गुन्हे शाखा व महिला सहाय कक्षाने रविवारी ही यशस्वी कारवाई केली. चारही आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत त्या गुन्हयाचा अधिक उलगडा केला. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी व क्राईम एसीपी प्रशांत राजे उपस्थित होते. फरीद अली एहसान अली (३०, रा.बडनगर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश), चंपादास बालुदास वैष्णव (३३, रा. देवडिया, ता. लसाडिया, जि. उदयपूर, राजस्थान), सुरेशदास जमनादास वैष्णव (४०, रा. दावडिया, ता. सराडा, जि. उदयपूर) व संजय पुूरूषोत्तमदास वैष्णव (२३, रा. आनंदीयोका गुढा, ता. लसाडिया, उदयपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील फरिदअली एहसान अलीच्या माध्यमातून त्या अल्पवयीन मुलीची १ लाख ३० हजारांमध्ये राजस्थानात विवाहासाठी विक्री करण्यात आली होती. तर संजय वैष्णव याच्याशी त्या मुलीचे लग्न लावून देण्यात आले होते.

चंपादास व सुरेशदास या दोघांशी फरीदअलीने तो व्यवहार केला होता. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पथके राजस्थान व मध्यप्रदेशात पाठविण्यात आली होती. चारही आरोपींना अमरावतीत आणल्यानंतर पिडित अल्पवयीन मुलीकडून त्यांची शहानिशा व ओळख परेड करवून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे.

यांनी केली मोहिम फत्ते

मानवी तस्करीच्या या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यांच्या आदेशाने उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे, महिला सहायता कक्षाच्या पोलीस निरिक्षक ज्योती विल्लेकर, सहायक पोलीस निरिक्षक पंकज चक्रे, सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे, हवालदार देवेंद्र कोठेकर, राजेंद्र काळे, पंकज गाळे, विशाल वाकपांजर, राहुल खंडारे, भुषण पद्मने आदींनी केली.अशी झाली होती घटना

२७ जानेवारी रोजी येथील एका अल्पवयीन मुलीला संतोष इंगळे व अन्य चौघांनी पळवून मध्यप्रदेशात पळवून नेले होते. तेथे फरिदअलीच्या माध्यमातून तिची राजस्थानात वैष्णव कुटुंबाला विक्री करण्यात आली. तेथे तिचा बालविवाह लावण्यात आला. तेथून तिने पळ काढून गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले होते. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच ते सहा जणांविरूद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. तर, संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा मुकेश राठोड (सर्व रा. अकोला) यांना अटक केली होती. यातील आकाश वेरूळकर हा अद्यापही फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करीAmravatiअमरावती