माजी आमदार अनिल गोंडाणे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:13 IST2019-09-21T21:13:32+5:302019-09-21T21:13:56+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) केंद्रीय सदस्य तथा माजी आमदार अनिल बाळकृष्ण गोंडाणे यांचे शुक्रवारी रात्री नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

माजी आमदार अनिल गोंडाणे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) केंद्रीय सदस्य तथा माजी आमदार अनिल बाळकृष्ण गोंडाणे यांचे शुक्रवारी रात्री नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोंडाणे यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या सरोज कॉलनी स्थित निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अनिल गोंडाणे यांनी दलित पँथर या संघटनेपासून सामाजिक कार्याला सुरूवात केली होती. विद्यमान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय असलेले अनिल गोंडाणे हे विधानपरिषदेचे आमदार होते. यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील हिंदूस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.