अमरावती व्हिजन २०२० : उपायुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देशगजानन मोहोड अमरावतीजिल्हा विकासाचा भविष्यातील वेध घेणारा ‘अमरावती व्हिजन-२०२०’ हा जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेला प्रारुप आराखडा इंग्रजी भाषेत आहे. हा सर्वसामान्य माणसाच्या पचनी पडेल काय, अशी विचारणा केली असता विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन) माधवराव चिमाजी यांनी जिल्हा प्रशासनाला मराठी भाषेत आराखडा रुपांतरित करावा, असे निर्देश दिले आहे.शासकीय कामकाजात महाराष्ट्राची राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य व बंधनकारक केले आहे. मात्र १२२ पानांचा आराखडा इंग्रजीत असल्याने जिल्हा प्रशासनाला मराठीचे वावडे आहे काय? ही जनभावना 'लोकमत'ने मांडली होती. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी त्यांच्या विभागाद्वारा ५ वर्षांत करावयाच्या विकास कामांचे प्रारुप या आराखड्यात आहे. जनतेच्या सूचना व अपेक्षासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी हा आराखडा १ एप्रिलला खुला केला. जिल्ह्याच्या संकेत स्थळावरदेखील तो उपलब्ध आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील तरतुदीनुसार १ मे १९६६ पासून शासनाचे सर्व कामकाज मराठीतून करणे बंधनकारक केले आहे. १० मे २०१२, २० आॅगष्ट २०१४ व २५ मार्च २०१५ या शासनाच्या परिपत्रकान्वये शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, पत्रव्यवहार, संकेतस्थळे, इत्यादीमध्ये मराठीचा वापर बंधनकारक आहे.सन २०११ मध्ये गठित ‘व्हिजन २०१५’ मराठीतजिल्हाधिकारी कार्यालयाने सन २०११ मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी तयार केलेला अमरावती जिल्हा व्हिजन २०१५ हा प्रारुम आराखडा मराठी भाषेत आहे. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे. शासनाच्या १९ विभागांनी सन २०१५ पर्यंत करावयाच्या विकास कामांचे प्रारुप पूर्णत: मराठीतच आहे. सर्वसामान्य नागरीकांना जिल्ह्याच्या विकासा विषयीची माहिती मराठी भाषेतूनच मिळायला पाहिजे. या प्रारुप आराखड्याचे मराठीमध्ये रुपांतरित करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. -माधवराव चिमाजी,उपायुक्त (सा.प्र.),अमरावती विभाग
प्रारुप आराखडा होणार मराठीत
By admin | Updated: April 5, 2015 00:18 IST