शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

राज्यातील ‘ग्रीन झोन’मधून वनजमिनी गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:51 AM

राज्यात २६ महापालिका, २५६ नगरपालिकांमध्ये विकास आराखड्यात मंजूर हरित पट्ट्यात आरक्षित वनजमिनी गहाळ झाल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्देविकास आराखड्याला छेद शहरी भागात प्रदूषणात प्रचंड वाढ

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात २६ महापालिका, २५६ नगरपालिकांमध्ये विकास आराखड्यात मंजूर हरित पट्ट्यात आरक्षित वनजमिनी गहाळ झाल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. वनजमिनींचा वनेत्तर कामांसाठी मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे शहरी भागात प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे वास्तव आहे.महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ कलम अस्तित्वात आल्यानंतर त्यातील १४ (फ) अंतर्गत ‘ग्रीन झोन’ जागांचे आरक्षण करण्यात आले. यात राखीव वने, संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आदींचा समावेश आहे. परंतु, २९ मे १९७६ च्या शासननिर्णयानुसार वनजमिनींचा वनेतर कामाकरिता वापर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. वनसंवर्धन कायद्यात वनजमिनींचा वनेतर कामांसाठी वापर करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य केले आहे. मात्र, महापालिका, नगरपालिकांनी ‘वन’ या संज्ञेतील वनजमिनींचा वापर वनेतर कामांसाठी करताना जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, सचिव, उपवनसंरक्षक आदींनी मूक संमती दर्शवून ‘ग्रीन झोन’मधील वनजमिनींची लूट चालविली आहे.सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २०२/९५ व १७७/९२ टी.एन. गोदावरम विरुद्ध भारत सरकार याप्रकरणी निर्णय देताना वनजमीन कोणाच्याही नावे असली तरी वनेत्तर वापरासाठी केंद्र सरकारची परवानगी बंधनकारक केली आहे. ‘ग्रीन झोन’मधील वनजमिनींचे आरक्षण बदलविण्यासाठी नगरसेवक आमसभेत प्रस्ताव मांडतात. हा प्रस्ताव एक तृतीयांश बहुमताने मंजूर होऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन समिती ते मंत्रालय असा प्रवास करून मान्यता मिळवतो. मात्र, जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून वनजमिनींचे रखवालदार असलेले उपवनसंरक्षक आरक्षित वनजमिनी गायब होत असताना कोणीही आक्षेप घेतला नाही. जिल्हा नियोजन समितीत वनजमिनींचा वैधानिक दर्जा बदलविला जात असताना वनविभागाने कोणतीही दखल घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :forestजंगल