हुशार माकडांपुढे वनविभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:02+5:30

रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा बेशुध्दीच्या एका इंजेक्शनमध्ये डॉट कुठलेही माकड बेशुध्द होते. दोन इंजेक्शन डाट मध्ये बिबट बेशुध्द होतो पन चार डॉट खाउनही हे माकड बेशुध्द पडले नाही. वनविभागाच्या डॉटवर त्याने चक्क जांबाच्या पेरूच्या पानांचा उताराच शोधून काढला.

The forest department is helpless in front of the clever monkeys | हुशार माकडांपुढे वनविभाग हतबल

हुशार माकडांपुढे वनविभाग हतबल

Next
ठळक मुद्देएक गंभीर जखमी : ब्राम्हणसभेत पुन्हा माकडाची दहशत, ‘मदत नको; माकडे आवरा’ची विनवणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक ब्राम्हणसभेत परत एकदा माकडाने दहशत पसरविली आहे. रहिवाशांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना कडाडून चावा घेत आहे. यात शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी तेथील ६८ वर्षीय मधुकरराव मोरे गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारला त्याच्या मांडीला त्या माकडाने कडाडून चावा घेतला. यात त्यांच्या मांडीचा लचकाच त्या माकडाने तोंडाला खाली पाडला. त्यांच्या दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्या पायावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचविली असून त्यांचेवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.
या पूर्वी ब्राम्हणसभेतील ४८ वर्षीय पुरू ष व ५० वर्षीय महिलेला गंभीर जखमी केले आहे. या ५० वर्षीय महिलेच्या टोंगळ्याची तर वाटीच सरकली होती. पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चरही झाला होता. या दोन घटनेनंतर त्या माकडाला ताब्यातही घेण्यात आले होते. दरम्यान यातील एक माकड वनविभागाच्या कस्टडीतून पळून गेले होते. पुढे त्याला परत वनविभागाने पकडले.
ब्राम्हण सभेत माकाडांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक आणि वनविभाग या माकडांमुळे त्रस्त आहेत. पंचनामा करू न वनविभाग या प्रकरणांची नोंद आपल्या दफ्तरी करत असले तरी माकडांमुळे झालेल्या नुकसानापोटी आर्थिक मदत मिळाली नाही. या करिता अनुदान शिल्लक नसल्याचे वनविभागाकडून सांगितल्या जात आहे. अनुदान नको, मात्र माकडांना आवरा, अशी गळ स्थानिकांनी घातली आहे.

हुशार माकड
ब्राम्णसभा निवासी ६८ वर्षीय मधुकरराव मोरे यांना गंभीर जखमी करणारे माकड चांगलेच हुशार निघाले वनविभागाने या माकडाला पकडण्याकरीता त्याला बेशुध्द करण्याचे ठरवीले रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा बेशुध्दीच्या एका इंजेक्शनमध्ये डॉट कुठलेही माकड बेशुध्द होते. दोन इंजेक्शन डाट मध्ये बिबट बेशुध्द होतो पन चार डॉट खाउनही हे माकड बेशुध्द पडले नाही. वनविभागाच्या डॉटवर त्याने चक्क जांबाच्या पेरूच्या पानांचा उताराच शोधून काढला.

Web Title: The forest department is helpless in front of the clever monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.