शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची लाखो हेक्टर जमीन गिळंकृत, राज्य शासनाचे अभय; वनसचिव हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:19 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही वनजमीन परत मिळविण्यासाठी वनसचिव हतबल झाल्याचे वास्तव आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य ३३ टक्के हिरवळमय करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याकरिता १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून राबविला जाणार आहे. त्याअनुषंगाने वनसचिव विकास खारगे हे वृक्ष लावगडीच्या नियोजनासाठी पायाला भिंगरी बांधून राज्यभर पालथे घालत आहे. जुलै महिन्यातील वृक्षारोपणासाठी जमिनींचा शोधदेखील घेतला जात आहे. यात सुमारे २० ते २५ यंत्रणांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. मात्र, राज्यात ३६ जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र हे ३०७६९० चौ.कि.मी. एवढे असून त्यात ५३४९८.०८ चौ.कि.मी. क्षेत्र पडीक आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३ नुसार राखीव वन म्हणून जाहीर करणे शक्य आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १७.३८ टक्के आहे. त्यामुळे भारतीय वननीती नुसार ३३ टक्के वनक्षेत्र होण्यासाठी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली पुरेशी जमीन उपलब्ध आहे. परंतु, महसूलचे अधिकारी वनविभागाची जमीन परत करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाने ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिंनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनिवार्य करून ४५ लाख हेक्टर वनजमिनींवर कोट्यवधींच्या संख्येने रोपवन करता येईल, हे वास्तव आहे. यापूर्वी वनसचिव विकास खारगे यांनी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली वनजमीन परत मिळविण्यासाठी शासन निर्णयदेखील काढला. मात्र, दीड वर्षानंतरही ‘महसूल’ने त्यांच्या ताब्यातअसलेल्या लिजवरील वनजमीन परत करण्याचे सौजन्य दाखविले नाही. यावरून ‘महसूल’ विभागाची लॉबी ‘स्ट्राँग’ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र