‘रघुवीर’च्या मुख्य कारखान्यावर धाड

By Admin | Updated: September 17, 2016 00:21 IST2016-09-17T00:21:40+5:302016-09-17T00:21:40+5:30

सातुर्णा परिसरातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानच्या मुख्य कारख्यान्यावर अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड टाकली.

Forage on Raghuvir's main factory | ‘रघुवीर’च्या मुख्य कारखान्यावर धाड

‘रघुवीर’च्या मुख्य कारखान्यावर धाड

शो कॉज’ नोटीस बजावली : सातुर्ण्यात एफडीएची सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई
अमरावती : सातुर्णा परिसरातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानच्या मुख्य कारख्यान्यावर अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड टाकली. एफडीएने सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली आहे. ‘रघुवीर’च्या कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर गुरूवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाम चौकातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानवर धाड टाकून येथील ‘रॉ मटेरियल’ जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. सलग दुसऱ्या दिवशीही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रघुवीरच्या कारखान्याची पाहणी केल्याने ‘रघुवीर’च्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मिठाईचा आणखी एक नमुना जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला. जप्त केलेल्या नमुन्यांची संख्या आता चार झाली आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान एफडीएचे अन्न व सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व भाऊसाहेब वाकडे हे सातुर्णा परिसरातील कारखान्यात पोहोचले. त्यांनी सुमारे दोन तासकारखान्याचा परिसर व तेथील कामकाजाची आणि साहित्याची तपासणी केली. अंबानगरीत ठिकठिकाणी असलेल्या ‘रघुवीर’ प्रतिष्ठानांसाठी लागणारा पेढा, मिठाई, खवा व ईतर मिष्ठान्न सातुर्ण्यातील कारखान्यात तयार करुन ते इतर प्रतिष्ठानांना पुरविले जातात.
संचालकाचे धाबे दणाणले
अमरावती : खाद्यपदार्थाचे प्रतिष्ठान किंवा कारखाना थाटताना एफडीएचा परवाना घेताना ठरवून दिलेले नियम व अटी आणि इतर मापदंडांचे पालन केले जाते की नाही, कमी दर्जाच्या भेसळयुक्त खव्याचा वापर मिठाई व पेढा तयार करताना होत आहे का? ज्याठिकाणी अन्न पदार्थ तयार केले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही, याची तपासणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केली.
या कारवाईमुळे ‘रघुवीर’च्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेल्या साहित्याचे नमुने सदोष आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Forage on Raghuvir's main factory