चढ्या दराने खाद्यपदार्थ विक्री

By Admin | Updated: April 12, 2015 00:22 IST2015-04-12T00:22:07+5:302015-04-12T00:22:07+5:30

बडनेरा रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट होत आहे. ..

Food sales at a high rate | चढ्या दराने खाद्यपदार्थ विक्री

चढ्या दराने खाद्यपदार्थ विक्री

रेल्वेतील वाढत्या गर्दीचा गैरफायदा : अवैध विक्रेत्यांचा सुळसुळाट
बडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट होत आहे. तापत्या उन्हात बिस्लेरी, कोल्ड्रींक्सची मागणी वाढली आहे. या सर्व वस्तूंची रेल्वेत चढ्या दराने विक्री होत असल्याची ओरड प्रवाशांमध्ये आहे. रेल्वे प्रशासन व पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाची ओळख जंक्शन म्हणून आहे. भारताच्या कोण्याही कोपऱ्यात प्रवाशांना बडनेऱ्यातून रेल्वेने प्रवास करता येते. येथून दिवसभरात ३५ ते ४० प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. दररोज ८ ते १० हजार प्रवासी बडनेरा रेल्वेस्थानकावर उतरतात व चढतात.
प्रवाशांच्या गर्दीचा व बाहेरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बडनेरा रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विकणारे जास्त पैसे घेऊन आपल्याजवळचा माल विकत असल्याची ओरड प्रवासी वर्गांमध्ये आहे. उन्ह तापायला लागली आहे. आईस्क्रीम, थंडपेय, बिस्लेरी बॉटल्सची बडनेरा रेल्वेस्थानक याठिकाणी चढ्या भावाने विक्री केली जात आहे. ५ ते ७ रूपये अधिक घेऊन प्रवाशांची लूट याठिकाणी सुरू आहे. याकडे रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.
मनमानी सुरू असणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाने अंकुश लावावा, जेणेकरून प्रवाशांना नाहक भुर्दंड बसणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहेत. (शहर प्रतिनिधी)

खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी वाढली
उन्हाळ्याच्या दिवसांत रेल्वेने प्रवाशांना आईस्क्रीम, थंडपेय, बिस्लेरी बॉटल्स, नाश्ता, खाद्यपदार्थांची प्रवासात सारखी गरज भासते. या थंडपेयांची प्रचंड मागणी सध्या वाढत असल्यामुळे खासकरून अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची रेल्वे स्थानकावर भरमसाठ गर्दी दिसून येते. मागणीमुळे खाद्यपदार्थ विक्रेते स्वत:जवळचा माल चढ्या दराने विकत आहेत. खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या व प्रवाशांची लूट यावर रेल्वे प्रशासन व पोलिसांचा कुठलाच अंकुश नसल्याचे चित्र बडनेऱ्यात पहावयास मिळत आहे.

Web Title: Food sales at a high rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.