शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरोपीस अटकेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सूचनांचे पालन

By admin | Updated: September 19, 2016 00:15 IST

वनेअथवा वन्यजीव गुन्ह्यांसदर्भात आरोपीस अटक करताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

वनविभागात प्रारंभ : मार्गदर्शक सूचना फलकाचे अनावरणअमरावती : वनेअथवा वन्यजीव गुन्ह्यांसदर्भात आरोपीस अटक करताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. याअनुषंगाने येथील वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयात शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले.आरोपींना अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन वनविभागाने करावे, यासाठी येथील कुलाकासा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. वडाळी वन कार्यालयात दर्शनी भागात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारे फलक लावण्यात आले आहे. कुलाकासा फाऊंडेशनचे उदय् देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. उदय देशमुख यांनी कोणत्याही गुन्ह्यात आरोपी अटक करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र वनविभागात ही उणीव असल्यामुळे अनेक प्रकरणांत पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत असल्याचे दिसून येते. आरोपीस अटक व चौकशी करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचे नाव, पद, हुद्दा स्पष्टपणे दिसेल, असे नामफलक गणवेशावर लावणे बंधनकारक आहे. अटक करताना पंचनामा तयार करावा. अटकेवळी कमीतकमी एक पंच जे शक्यतो आरोपींच्या कुटुंबातील असावेत. अटक पंचनाम्यात वेळ, तारीख नमूद असावी. त्यावर आरोपींची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. वनाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आणलेल्या आरोपीस त्यांचे मित्र किंवा नातेवाईक, परिचित व्यक्तीस सोबत ठेवता येईल. अटक केलेल्या आरोपीस नातेवार्इंकांना कळविणे बंधनकारक केले आहे. अटकेबाबतची नोंद डायरीमध्ये करून कोणत्या अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपविण्यात आली, हे स्पष्ट करावे लागेल. अटक करतेवेळी आरोपींचे वैद्यकीेय परीक्षण करून त्याच्या शरीरावर असणाऱ्या लहान, मोठ्या जखमांची नोद करून घ्यावी लागेल. दर ४८ तासांनंतर अटकेतील आरोपींची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. आरोपीस चौकशीवेळी वकिलांना भेटण्याची मुभा राहील. पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करून अटकेबाबतची माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.