धुके, हुडहुडी अन् शेकोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:21+5:30

हुडहुडी भरविणारी ही थंडी ज्येष्ठांना काहीशी असह्य झाली असली तरी शेकोट्या पेटवून अनेकांनी थंडीत ऊब घेण्याची मौज लुटली. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. सरत्या वर्षाला निर्माण झालेल्या या वातावरणाची सर्वत्र चर्चा होती. मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी जाण्याचा अनेकांनी ऐनवेळी बेत आखला. चिखलदरा या वातावरणामुळे धुक्यात हरवले होते.

Fog, hoods and breeze | धुके, हुडहुडी अन् शेकोट्या

धुके, हुडहुडी अन् शेकोट्या

ठळक मुद्देकाही भागात पाऊस : आज गारपिटीची शक्यता

अमरावती : सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अवघा दिवस धुके, हुडहुडी अन् पावसाच्या वातावरणाने अविस्मरणीय ठरला. या वातावरणाचा आनंद जिल्हावासीयांनी लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी जणू निसर्गाने ही भेट दिली, अशी प्रतिक्रिया आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनी दिली.
हुडहुडी भरविणारी ही थंडी ज्येष्ठांना काहीशी असह्य झाली असली तरी शेकोट्या पेटवून अनेकांनी थंडीत ऊब घेण्याची मौज लुटली. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. सरत्या वर्षाला निर्माण झालेल्या या वातावरणाची सर्वत्र चर्चा होती. मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी जाण्याचा अनेकांनी ऐनवेळी बेत आखला. चिखलदरा या वातावरणामुळे धुक्यात हरवले होते.
सरत्या वर्षाच्या थंडगार दिवसाचा नववर्षाच्या आनंदावर फारसा फरक पडला नाही. अंगावर जॅकेट चढवून आणि डोक्याला मफलर बांधून तरुणाई घराबाहेर पडली. थंडी घालवण्यासाठी खवय्यांनी घरगुती पदार्थांसह गरमागरम पदार्थांच्या स्टॉलकडे मोर्चा वळविला होता. भजी, मुगवडे, बटाटा वडा, जिलेबी आदी खाद्यपदार्थांसह कॉफी, गरमागरम दुधाचाही आस्वाद घेण्यासाठी सायंकाळपासून शहरातील विविध चौकांतील स्टॉलवर गर्दी होती.
दरम्यान, नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी निश्चित केलेले ठिकाण, हॉटेलकडे शहरवासीयांची पावले वळत होती. थंडीचा कडाका पाहता, अशा ठिकाणीदेखील शेकोट्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूने बसून ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद अमरावतीकरांनी लुटला.

Web Title: Fog, hoods and breeze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस