काँक्रिटीकरणावर लक्ष, व्यायामशाळांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 24, 2014 23:37 IST2014-07-24T23:37:10+5:302014-07-24T23:37:10+5:30
राज्य शासनाकडून आमदारांना दरवर्षी विकासकामांसाठी दोन कोटींचा वार्षिक निधी दिला जातो. या निधीतून सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ८ आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या

काँक्रिटीकरणावर लक्ष, व्यायामशाळांकडे दुर्लक्ष
आमदार निधी : वर्षभऱ्यातील विकास कामांचा लेखाजोखा
अमरावती : राज्य शासनाकडून आमदारांना दरवर्षी विकासकामांसाठी दोन कोटींचा वार्षिक निधी दिला जातो. या निधीतून सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ८ आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामात काँक्रिटीकरण कामाकडे लक्ष वेधून व्यायामशाळांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे विकास कामांच्या वार्षिक माहिती पुस्तिकेमधून दिसून आली.
लाखोंच्या संख्येने एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना परिसरच्या विकासासाठी निवडून दिले जाते. या लोकप्रतिनिधिंकडून सर्वसामान्य जनतेना अनेक विकास कामांच्या अपेक्षा असतात. यामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांसह रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या प्रमुख गरजा प्रधान्याने सोडविणे आवश्यक आहे. इतरही विकास कामे तेवढीच महत्त्वाची आहेत. वर्षाकाठी मिळणाऱ्या आमदार निधीतून आमदारांकडे विकास कामांची मागणी अधिक असते. मात्र यातून महत्त्वाच्या विकास कामांना प्राधान्यक्रम लावण्याची जबाबदारीही यांची आहे. मात्र हे सर्व करतताना आमदारांनी विकास हाच केंद्रबिंदू मानून वर्षभऱ्यात केलेली कामे समाधानकारक असली तरी या कामांवर नजर टाकल्यास काँक्रीट रस्ते, समाज भवन, सौंदर्यीकरण व तुरळक पाणीपुरवठा योजना या कामांवर लोकप्रतिनिधींनी अधिक भर दिला. यापैकी काहींनी वाचनालय, शाळा व शिक्षण संस्थांना साहित्य पुरवठा करण्यावरच निधी खर्च केल्याचे दिसून येते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी वर्षभरात प्राप्त निधिनुसार विकास कामे केली. शिवाय शासनाकडून मिळणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या निधीपेक्षा अधिक विकास कामे करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अनेक कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ एका आमदारानेच व्यायाम शाळेला तर एकाने स्मशान भूमीला निधी उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे काही आमदारांनी साहित्य पुरवठा, प्रवासी निवारे यावर अधिक खर्च केले. एका आमदाराने पाणीपुरवठा योजनेवर भर दिला. मात्र इतर कामांवर दुर्लक्ष केले. सौंदर्यीकरण, समाज भवन व कांक्रीट रस्त्यांचा वर्षभरात बोलबाला असला तरी ८ ही आमदारांचा वार्षिक विकास कामात डांबरीकरण कामांना मात्र नगण्य प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होते. आमदारांनी काही ठिकाणी पेविंग ब्लॉक व इतर विकास कामे केली.