विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार

By Admin | Updated: August 3, 2015 23:55 IST2015-08-03T23:55:24+5:302015-08-03T23:55:24+5:30

सद्यस्थितीत छत्तीसगड आणि विदर्भ ढगांनी आच्छादले असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

Floody areas in Vidarbha | विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार

विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार

अंदाज : १० आॅगस्टपर्यंत कमी-अधिक पाऊस
अमरावती : सद्यस्थितीत छत्तीसगड आणि विदर्भ ढगांनी आच्छादले असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच चक्राकार वाऱ्यामुळे पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्यप्रदेशासह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बसरण्याची शक्यता आहे. १० आॅगस्टपर्यंत विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून पाहिजे तसा पाऊस अद्यापपर्यंत पडला नाही. त्यातच जुलै महिन्यात तब्बल २५ दिवस पावसाने दडी दिल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर दोन ते तीन दिवस तुरळक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांसह लोकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा काही दिवस पावसाने दांडी मारली. आता आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून १० आॅगस्टपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

छत्तीसगड आणि विदर्भावर ढंगाची गर्दी आहे. त्यातच कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे ही स्थिती पाऊस पडण्यासाठी अनुकुल आहे. येत्या ४८ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून १० आॅगस्टपर्यंत कमी-अधिक पाऊस पडेल.
- अनिल बंड,
हवामानतज्ज्ञ, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय.

Web Title: Floody areas in Vidarbha