बेलोरा विमानतळावरुन एप्रिलपासून विमानांचे होईल 'टेक ऑफ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:11 IST2025-03-05T11:10:33+5:302025-03-05T11:11:36+5:30
Amravati : भारतीय विमानतळ प्राधिकरण चमूकडून चाचणी, अमरावती-मुंबई विमानसेवा

Flights to 'take off' from Belora airport from April
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या चमूकडून बेलोरा विमानतळावर मंगळवारी 'हवाई कॅलिब्रेशन' ही चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे एप्रिलपासून विमानांचे 'टेक ऑफ' होणार असून, अमरावती-मुंबई ७२ एटीआर विमानसेवेचा अमरावतीकरांना लाभ मिळेल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
विमानतळाची 'पापी' हवाई कॅलिब्रेशनद्वारे चमूने चाचणी केली. यात बेलोरा विमानतळाचे प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटरचे हवाई कॅलिब्रेशन पूर्ण केले आहे. विमानचालन सुरक्षिततेत आवश्यक साधन असलेली पापी प्रणाली, धावपट्टीवर येणाऱ्या विमानांना अप्रोच दरम्यान योग्य ग्लाइड स्लोप राखण्यासाठी आणि सुरक्षित लैंडिंगसाठी सुनिश्चित करते, हे विशेष.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक हजर
- बेलोरा विमानतळाचे 'पापी हवाई कॅलिब्रेशन' महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्या मुंबईहून आल्या होत्या.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानतळाने कॅलिब्रेशन केले. जे ७सदस्यांच्या क्रूसह बंगळुरूहून विमानतळावर कॅप्टन अनूप काचरू आणि विमानचालन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
- विमानाने २६/०८ धावपट्टीच्या बाजूने अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि यशस्वीरीत्या कॅलिब्रेशन पूर्ण केले.
- पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर सिव्हिल वर्क आधीच पूर्ण झाले आहे. अलायन्स एअर प्रादेशिक कनेक्टिविटी योजनेंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर एटीआर ७२ सह नियोजित ऑपरेशन्स होईल.
- बेलोरा विमानतळावर लावण्यात आलेली सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय विमानचालन संस्थांद्वारे निर्धारित कठोर मानकांना पूर्ण करतात.
७२ सीटर
अमरावती - मुंबई विमानसेवा एप्रिलपासून सुरू होईल. पापी 'कॅलिब्रेशन' विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा घटक
"बेलोरा विमानतळाचे मंगळवारी 'हवाई कॅलिब्रेशन'झाले. आता केंद्रीय उड्डयन मंत्रालयातून प्रवासी वाहतूक परवाना लवकर मिळेल. साधारणतः एप्रिलमध्ये विमानांचे 'टेक ऑफ' होईल."
- गौरव उपश्याम, प्रभारी प्रबंधक, बेलोरा विमानतळ