शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत १० हजारांवर रोपट्यांचे झाले वृक्षात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेम : जुळ्या शहरवासीयांची साथ, ग्लोबल वॉर्मिंग थांबविण्यासाठी एकवटले ध्येयवेडे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्याकरिता तालुक्यातील काही ध्येयवेड्यांनी एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी रोपट्यांची लागवड केली होती. त्यांची निगा राखल्याने सद्यस्थितीत त्या १० हजार रोपट्यांचे वृक्षात रुपांतर झाले आहेत.अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात. परतवाडा शहरात काही वर्षांपासून आदिवासी पर्यावरण संघटनेच्यावतीने त्याचा लेखाजोखा ठेवण्यात आला. पाच वर्षांत १० हजारांवर लावलेल्या रोपट्यांचे वृक्ष आणि आता झाडात रुपांतर होऊ लागले आहे. शहर सौंदर्यावर शासन-प्रशासन भर देत असला तरी वृक्षलागवड मोहिमेत फोटो काढून प्रसिद्ध करण्यापर्यंतच अनेकांची धावपळ असते. या सर्व बाबीला फाटा देत आदिवासी पर्यावरण संघटना एकला चलोप्रमाणे पुढे निघाली आणि त्यांच्या हाकेला ओ देत येथील प्रशासकीय अधिकारी सामाजिक संघटनांनी पुढे येऊन चांगल्या कामाची सुरुवात जुळ्या शहरात मागील पाच वर्षांपूर्वी केली, हे विशेष.शाळा, मंदिर-मशिद, चर्च परिसरात वृक्षारोपणआदिवासी पर्यावरण संघटनेने वृक्षलागवड मोहिमेत मंदिर-मशिद, मदरसा खुल्या जागेत सामाजिक वनीकरण, नगर परिषद व वनविभागाच्या सहकाऱ्याने लाखो झाडे लावलीत. यात संघटनेचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्रदीप चांदूरकर, प्यारेलाल प्रजापती, नवीन प्रजापती, राजेन्द्र मुंदे, ममता डहाके, मनीराम चिलाटी, राज इंगळे बाबाराव बेठे, किशन जामकर, सहकारी नागरिक जितु तुरकडे, संतोष मोहोकर आदींचा समावेश आहे.वृक्ष कटाईवरही लावले निर्बंधवृक्षलागवड मोहिमांवर जनजागृती करीत शालेय विद्यार्थी ते प्रशासकीय अधिकारी, नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. परंतु मनमर्जीने वृक्षकटाई मोहीम सुरू केल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. वृक्षकटाई करण्यापूर्वी पालिकेच्यावतीने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी सबंधितांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वृक्षकटाईला आळा बसणार आहे.

टॅग्स :forestजंगल