शाळेचा पहिला दिवस: कुठे साफ-सफाई तर कुठे लेट लतीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:40+5:302021-06-29T04:10:40+5:30
भूगावची शाळा पहिल्याच दिवशी लेट, गुरुजी दुसऱ्याच कामात बिझी, लोकमत रियलिटी चेक फोटो पी २८ जावरे परतवाडा- नरेंद्र जावरे ...

शाळेचा पहिला दिवस: कुठे साफ-सफाई तर कुठे लेट लतीफ
भूगावची शाळा पहिल्याच दिवशी लेट, गुरुजी दुसऱ्याच कामात बिझी,
लोकमत रियलिटी चेक
फोटो पी २८ जावरे
परतवाडा- नरेंद्र जावरे
सोमवार २८ जूनपासून विदर्भातील शाळांची घंटा विद्यार्थ्यांविना वाजली. कोरोना कहर पाहता ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. परंतु, लोकमतने सोमवारी अगदी रस्त्यावरील शाळांची रियालिटी चेक केली. मोजक्या शाळा वगळता ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ दिसून आला, तर शिक्षक शासनाने लादलेल्या वेगळ्याच कामात व्यस्त दिसून आले. सुबोध हायस्कूलमध्ये मात्र शिक्षक मुख्याध्यापक वृंद दहावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे गिरवत असल्याचे दिसून आले.
1 भूगाव: आदर्श विद्यालय
पहिल्याच दिवशी लेटलतीफ
परतवाडा अमरावती मार्गावरील भूगाव येथील आदर्श शिक्षण संस्थाद्वारा संचालित आदर्श विद्यालय या शाळेत ११:१९ वाजता भेट दिली असता शाळेला, फाटकाला, मुख्याध्यापक कक्षाला कुलूप आढळून आले. शाळा ११ वाजता सुरू होते. त्यामुळे विद्यार्थी नसल्याने आम्हीसुद्धा याच वेळेला पोहोचतो, असे मुख्याध्यापक आर.के गादे यांनी सांगितले. शाळेत एकूण पाच ते दहावीपर्यंत सहा वर्ग असून मुख्याध्यापकासह आठ शिक्षक आहेत. गतवर्षीच्या पटनोंदणी व २२४ विद्यार्थी असून रविवारी रोग निदान शिबिर शाळेत असल्यामुळे दोन-तीन दिवसांपासून शिक्षक व्यस्त होते. त्यामुळे साफसफाई ११ वाजतानंतर सुरू झाली, ऑनलाइन शिक्षणासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षक उपस्थिती पाहून विद्यार्थ्यांना वेळापत्रक दिला जाणार असल्याचेही संपर्क केला असता, मुख्याध्यापक व गादे यांनी सांगितले.
2 सुबोध हायस्कूल
शिक्षक उपस्थित ऑनलाइन शिक्षण
शहरातील नामवंत असलेल्या सुबोध हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात १२:२२ वाजता भेट किती असता, मुख्याध्यापक संजय चौबे शिक्षक वैभव भारतीय एका वर्गखोलीत विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन लिंक पाठविल्यानंतर धडे गिरवताना दिसून आले. या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग असून, एकूण १४२२ विद्यार्थी संख्या आहेत. २३ शिक्षक कार्यरत असून, दोन पाळीत शाळा चालविली जाते. सकाळीच सरस्वती पूजन आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सुरुवात झाली. दुसरीकडे शाळेत सॅनिटायझर फवारणी सुरू असल्याचे दिसून आले. दोन्ही शिफ्ट मध्ये शिक्षक येण्यापूर्वी गेल्यानंतर केली जात असून, शासन निर्देशानुसार शिक्षकांच्या उपस्थितीचे पालन केल्या जाणार असल्याचे मुख्याध्यापक संजय चौबे यांनी सांगितले.
३ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अचलपूर
ऑनलाइन शिक्षण २२२ पैकी ६० विद्यार्थ्यांजवळच मोबाईल
अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शाळेत सर्वात मोठी माध्यमिक शाळा आहे. परकोटामध्ये असलेल्या या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत २२२ विद्यार्थी असून, सहा शिक्षक कार्यरत आहेत. पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती होती. मुख्याध्यापक एन. एस. चव्हाण, उपस्थित होते. शाळा तपासणीसाठी पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख नीळकंठ दलाल शिक्षकांना शासन निर्णयासंदर्भात बोलताना दिसून आले. परंतु ऑनलाइन शिक्षणासंदर्भात २२२ पैकी केवळ ५० ते ६० विद्यार्थ्यांजवळच अँड्रॉइड मोबाईल असल्याने मुख्याध्यापकांनी सांगितले. अचलपूर शहरात शाळा असल्यामुळे येथे आधार कार्ड वरील दुरुस्तीसाठी नागरिक मुख्याध्यापकांकडे आले होते. पोषण आहारसुद्धा ऑनलाईन होणार असल्याने त्याचे काम शिक्षकांवर येणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे बीएलओ कामात काही शिक्षक व्यस्त असल्याचे सांगितले.
४ एकलापूरच्या शाळेत नवे विद्यार्थी जुने पुस्तक
शाळेच्या पहिल्याच दिवशी परतवाडा चिखलदारा मार्गावरील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकलासपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून, सात शिक्षक १५९ विद्यार्थी असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेंद्र अर्डक यांनी दिली. संजय देवरे शिक्षक व इतर शिक्षिका उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतमजूर शेतकऱ्यांची मुले असल्याने केवळ ९० विद्यार्थ्यांजवळ मोबाईल असल्याने इतर विद्यार्थ्यांना शिक्षक मित्रांमार्फत धडे गिरवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे शासनाने लागलेल्या इतर कामाची बोंब येथेही दिसून आली.