शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

‘पिंक रूम’ची राज्यातील पहिली संकल्पना अमरावतीत साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:05 PM

वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले.

ठळक मुद्देमणिबाई गुजराती महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले.गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मणिबाई गुजराती महाविद्यालयात 'पिंक रेस्ट रूम फॉर गर्ल्स' या संकल्पनेतून 'पिंक रूम' निर्माण करण्यात आली आहे. मुलींचा शिक्षणात टक्का वाढावा, कौटुंबिक अडचणी, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुलीला इयत्ता सातवीपर्यंत शिकविण्याचा विचार करीत होते. परिणामी त्या पुरुषांच्या अधिपत्याखालीच अत्याचार सहन करीत होत्या. पुढे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शासनाने विविध उपक्रम राबविल्या. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींची प्रगती दिसून येत आहे. मात्र, शाळेत असताना मासिक पाळी आल्यास सुविधेअभावी कुचंबना होते. इतरांना माहिती झाल्यास बदनामी होण्याची शक्यता पाहता मुली अशा वेळी शाळेत येण्याचे टाळतात. यामुळे अनेक मुलींनी शाळा सोडल्याचे निदर्शनास आले. त्यावर स्थानिक मणिबाई गुजराती हायस्कूलच्या प्राचार्य अंजली देव यांनी मुलींच्या सुविधेसाठी 'पिंक रुम'ची संकल्पना साकारली. 'पिंक रुम'मध्ये नॅपकीन पॅडच्या मशीन्स, व्हिलचेअर, आराम करण्याकरिता बेडरूमची व्यवस्था करण्यात आली. यासाठी संस्थाध्यक्षांसह समितीने प्रोत्साहन दिल्याने हे साध्य झाले असून, शनिवारी ह्यपिक रुमह्णचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसा दिलीप पोपट, प्रमुख अतिथी म्हणून रेखा दिलीप वस्तानी, पश्मी परेश राजा, जयश्री नीलेश लाठीया, स्मिता हर्षद उपाध्याय, सोनल भरत भायानी, अल्का जितेंद्र दोशी, हेमा देसाई, वंदना लाठीया, पीएसआय कान्होपात्र बन्सा, प्राजक्त धावडे, प्राचार्य अंजली देव, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दया चव्हाण, पर्यवेक्षिका आशा कोष्टी व मोहना कुळकर्णी, प्राची पालकर, प्रिया तुषार भारतीय, अनिता कुळकर्णी, वैशाली देसाई उपस्थित होत्या. पिंक रूमची उपयोगिता, वैशिष्ट्य व संकल्पना मोहना कुलकर्णी यांनी विशद केली. पाहुण्यांचा परिचय शिक्षिका सरिता गायकवाड यांनी करून दिला. मुख्याध्यापिका अंजली देव यांनी प्रास्ताविक केले. संचालन मृणाल देशमुख, वांशिका हरवाणी यांनी, आभार वैशाली भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.हजार मुलींचा प्रवेशमणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये इयत्ता ७ वी ते १० वीपर्यंत हजार मुली शिक्षणाचे धडे घेत असून, त्यांच्या अंतर्गत अडचणीमुळे शिक्षणात बाधा येऊ नये, यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कुणी त्रस्त करीत असल्यास हेल्पलाईन क्रमांकदेखील मुलींना देण्यात आले आहे. ही खरी निकड लक्षात घेऊन 'पिंक रुम' साकारली आहे. ज्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होतो, त्याचे आकर्षण अधिक असते. त्यातूनच क्राईम घडते. म्हणून प्रत्येक महाविद्यालयात हा उपक्रम राबविल्यास ही बाब सर्वसामान्य होऊन मुला-मुलींमधील भेद दूर होऊ शकेल.- अंजली देव, प्राचार्य, मणिबाई गुजराती कनिष्ठ महाविद्यालयही मुलींची खरी गरज आहे. परंतु, कुणासमोर समस्या मांडू शकत नाही. त्यामुळे शाळेत येण्याचे टाळणे हाच त्यावरील उपाय मुली मानतात. या संकल्पनेचे आमच्यातर्फे स्वागत आहे.- साक्षी अनासाने, विद्यार्थिनी, मणिबाई गुजराती'पिंक रुम'ची संकल्पना खरोखरच प्रशंसनीय आहे. अचानक ओढावणाºया प्रसंगाला सामोरे जाणाºया मुलींसाठी ही आपत्कालीन सुविधा झाल्याचे समाधान वाटते.- सुरभी भेलकर, मणिबाई गुजराती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्य