शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

स्व-रक्षणासाठी हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:53 PM

लघुशंकेवरून उफाळलेल्या वादानंतर तलवार व लाठीने हल्ला चढविणाºया युवकांचा संभाव्य धोका लक्षात घेता युवा काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी रिव्हॉल्वरने हवेत फायरिंग केली.

ठळक मुद्देलघुशंकेवरून उफाळला वाद : दोन आरोपींना अटक, अन्य पसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लघुशंकेवरून उफाळलेल्या वादानंतर तलवार व लाठीने हल्ला चढविणाºया युवकांचा संभाव्य धोका लक्षात घेता युवा काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी रिव्हॉल्वरने हवेत फायरिंग केली. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील कॅम्प कॉर्नर बारजवळ घडली. या घटनेमुळे फ्रेजरपुरा परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये अनिकेत देशमुख व तौसीफ अहमद यांच्या गटाविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहे.पोलीस सूत्रानुसार, चपराशी पुरालगत कॅम्प पॉईन्ट बारमधून तौसिफ अहमद वल्द शेख हसन व जियाउर रहेमान ऊर्फ बबलू यांनी बारच्या बाजूला भिंतीलगत लघुशंका केली. कॅम्प पॉईन्टबाजुलाच अनिकेत देशमुख यांचे निवासस्थान असल्याने त्यांची आईसुध्दा घराच्या आवारात उभी होती. देशमुख यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे अनिकेत व त्यांचे मित्रसुध्दा घराजवळ उभे होते. त्यांनी हा प्रकार बघून तौसिफ व जियाउरला लघुशंका केल्याबाबत हटकले. याच मुद्यावरून अनिकेत व तौशिफ यांच्यात वाद उफाळला. धक्काबुक्कीनंतर हाणामारी होऊन अनिकेत देशमुख, त्यांचा मित्र संग्राम देशमुख व अंकुश डहाके यांच्यासह दुसºया गटातील तौसिफ व जियाउर रहेमान जखमी झाले. हा गोंधळ सुरू असताना हल्ल्याचा संभाव्य धोका पाहता जीव वाचविण्यासाठी अनिकेतने हवेत गोळीबार केला. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त व फे्रजरपुºयाचे ठाणेदार राहुल आठवले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी तणावसदृशी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.अनिकेत देशमुख यांच्याकडे रिव्हॉल्वरचा परवाना असून त्यांनी स्व-रक्षणासाठी हवेत फायरिंग केली. दुसºया गटातील तरुणांनी तलवार व लाठ्यांनी हल्ला चढविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याअनुषंगाने फे्रजरपुरा पोलिसांनी अनिकेतजवळील रिव्हॉल्वर व तौसिफकडून तलवार व लाठी जप्त केली. या घटनेची माहिती राज्यस्तरावर पोहोचली असून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अमरावती पोलिसांना विचारणा करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत या घटनेचा आढावा घेतला जात आहे.दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखलअनिकेत देशमुख यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी जियाउर रहेमान, तौसिफ अहमद व अन्य चार जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ४/२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. तौसीफ अहमदच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिकेत देशमुख, संग्राम देशमुख, अंकुश डहाकेसह चौघांविरुद्ध ३२४, १४३, १४७, १४९, ५०४ ३/२५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तौसिफ व जियाऊरला अटक केली असून देशमुख गटातील एकास अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी तिघांना न्यायालयात हजर केले.तौसिफच्या वाहनाची तोडफोडतौसिफ व त्याचा मित्र जियाऊर यांच्यासह चारजण एमएच ०४ डीएन८४२३ या वाहनाने बारमध्ये आले होते. दरम्यान झालेल्या हाणामारीनंतर अनिकेत देशमुख यांच्या गटातील सदस्यांनी तौसिफ याने चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप तौसिफने केला आहे.यशोमती ठाकूर, संजय बंड घटनास्थळी दाखलघटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर व माजी आमदार बंड घटनास्थळी यांनी भेट देऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. हा वाद विकोपाला जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य बघता फे्रजरपुरा पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे नोंदविले.