शिरपूर गावानजीकच्या पहाडाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:42+5:302021-04-05T04:12:42+5:30

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिरपूर येथील पारधी बेड्यानजीकच्या पहाडाकडील ई-क्लास जमिनीवरील गवत पेटले. ही आग पाहता पाहता गावानजीक २०-२५ ...

Fire on the hill near Shirpur village | शिरपूर गावानजीकच्या पहाडाला आग

शिरपूर गावानजीकच्या पहाडाला आग

googlenewsNext

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिरपूर येथील पारधी बेड्यानजीकच्या पहाडाकडील ई-क्लास जमिनीवरील गवत पेटले. ही आग पाहता पाहता गावानजीक २०-२५ फूट अंतरावर वस्तीपर्यंत येऊन पोहोचली. याठिकाणी सुमारे शंभर घरांची वस्ती आहे. गावकºयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली व अनर्थ टाळला.

ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. चांदुर रेल्वे येथून अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी सरपंच निवृत्ती केशरखाने, तलाठी शितल राठोड, ग्रामसेविका एल व्ही लोंधे, पोलीस पाटील दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य आरवंती भोसले, लक्ष्मी राऊत, दिवाकर माकोडे, किरण सरदार, अनिल शेगोकार व गावकरी मंडळी घटनास्थळी दाखल झाली होती.

Web Title: Fire on the hill near Shirpur village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.