अमरावती - धारणी शहरातील बस स्थानकालगत सर्व्हे नंबर १२६ या भूखंडावर दुकानांना लागलेल्या आगीत १५ दुकाने जळून खाक झाली. शुक्रवारी पहाटे ४ वाजता लागलेली आग सकाळी ९ वाजता शांत झाली. यामध्ये कापड दुकान, मेडकिल स्टोअर, चप्पल दुकान, हॉटेल आदी प्रतिष्ठानांतून कोट्यवधीचे नुकसान झाले. धारणी, चिखलदरा, ब-हाणपूर, खंडवा, अचलपूर येथून अग्निशामक बंब मागविण्यात आले होते. याशिवाय स्थानिक १० ते १२ टँकरने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. धारणी पोलीस, नगरपंचायतचे अधिकारी व तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. सध्याही त्यातील लाकूड फाटा जळतच आहे. यापूर्वी १९९३ मध्ये येथे एवढी मोठी आग लागली होती.
धारणीत १५ दुकानांना आग, कोट्यवधीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 12:19 IST