शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

होम आयसोलेशनमधील दोन संक्रमित रुग्णांना ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 5:00 AM

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार होम आयसोलेशनमध्ये नियमभंग करणाऱ्या रुग्णांवर कलम १८८ अन्वये तसेच साथरोग प्रसार नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांना गृह विलगीकरणामधून काढून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. दंडात्मक रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करामध्ये जोडली जाणार असल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांनी सांगितले.

ठळक मुद्देआतापर्यंत १२ रुग्णांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : होम आयसोलेशनमधील संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नरेडीनगर  व कंवरनगर भागातील दोन रुग्णांना २५ हजार रुपये दंडाच्या नोटीस बजावण्यात आल्या. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी केली. या रुग्णांनी त्यांच्या घरावर लावलेले फलक काढले होते. पथकाद्वारे तात्काळ तपासणी करून फलक पुनर्स्थापित करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार होम आयसोलेशनमध्ये नियमभंग करणाऱ्या रुग्णांवर कलम १८८ अन्वये तसेच साथरोग प्रसार नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांना गृह विलगीकरणामधून काढून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. दंडात्मक रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करामध्ये जोडली जाणार असल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांनी गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक व नियंत्रण कक्ष या दोन्ही यंत्रणांद्वारे गृह विलगीकरणाच्या अटी-शर्ती मोडणाऱ्या रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सचिन बोंद्रे, नीलेश सोळुंके, शिक्षक  संचालकांनी  मंगळवारी ही कारवाई केली.

आतापर्यंत १२ रुग्णांवर कारवाईमहापालिका क्षेत्रात १ ऑगस्ट २०२० पासून स्वतंत्र खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असणाऱ्या असिम्प्टमॅटिक रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा दिली जाते व या रुग्णांची नियंत्रण कक्षाद्वारे रोज दोन वेळा चौकशी केली जाते. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत ७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यत १६,१७७ रुग्णांनी ही सुविधा घेतलेली आहे. यामध्ये नियमांचा भंग करणाऱ्या १२ रुग्णांना प्रशासनाद्वारे प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. रुग्णांद्वारा दंड न भरण्यात आल्याने ही रक्कम मालमत्ता करात जोेडण्यासाठीचे प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे डाॅ सचिन बोंद्रे यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या