होम आयसोलेशनमधील दोघांना ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:03+5:302021-04-22T04:14:03+5:30
अमरावती : होम आयसोलेशनमधील नियमांचे भंग करणाऱ्या दोन रुग्णांना महापालिकेच्या पथकाने प्रत्येकी २५ हजारांची नोटीस बजावली. दंडाचा भरणा ...

होम आयसोलेशनमधील दोघांना ५० हजारांचा दंड
अमरावती : होम आयसोलेशनमधील नियमांचे भंग करणाऱ्या दोन रुग्णांना महापालिकेच्या पथकाने प्रत्येकी २५ हजारांची नोटीस बजावली. दंडाचा भरणा न केल्यास मालमत्ता करात सदर नोंद घेण्यात येऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे सचिन बोंद्रे यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रात वर्षभरापासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले व बरे झाले महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधा अंतर्गत वेबसाईट तयार करण्यात आली व व्हाॅट्सॲप क्रमांक देण्यात आले तसेच रुग्णांच्या घरावर बोर्ड लावणे, दंडात्मक कारवाई करणे इत्यादी प्रकारच्या नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.
दैनंदिन स्वरुपात ३० शिक्षक व भरारी पथक यांची निर्मिती करण्यात आली. या पथकाद्वारे नियमांचा भंग करणाऱ्या रुग्णांवर २५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. नोटीस देण्यात येते. त्यानुसार बुधवारी म्हाडा कॉलनी, राधानगरात भरारी पथकाद्वारे नोटीस देण्यात आली आहे. आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशानुसार नियमांचा भंग करणाऱ्या रुग्णांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बोंद्रे म्हणाले.