परतवाड्यात इच्छुक उमेदवारांची घरासाठी शोधमोहीम

By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:47:30+5:302014-07-30T23:47:30+5:30

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. मात्र या मतदारसंघावर चौफेर लक्ष ठेवता यावे, याकरिता इच्छुक

Finding the desired candidates for returning home | परतवाड्यात इच्छुक उमेदवारांची घरासाठी शोधमोहीम

परतवाड्यात इच्छुक उमेदवारांची घरासाठी शोधमोहीम

विदर्भ मिल परिसराला प्राधान्य : अचलपूर मतदारसंघात स्थानिक, बाहेरील वाद जोरात
अमरावती : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. मात्र या मतदारसंघावर चौफेर लक्ष ठेवता यावे, याकरिता इच्छुक उमेदवारांनी परतवाडा येथे घर भाड्याने घेण्यासाठी जोरात शोधमोहीम चालविली आहे. विशेषत: विदर्भ मिल परिसराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याचा समावेश असलेला अचलपूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र कालांतराने राजकीय समीकरण बदलले. मागील दहा वर्षांपासून हा मतदारसंघ अपक्ष उमेदवारांच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस रणनीती आखते. परंतु अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने काँग्रेसला अपयश येत असल्याचे वास्तव आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, बसप, रिपाइं व मनसेने उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. यात पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात भेटीगाठी, बैठकी, कार्यक्रमांना उपस्थिती, मेळावे आयोजनाचा धडाका सुरु केला आहे. २५ आॅगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी परतवाडा हे मुख्यालय बनविण्याची तयारी केली आहे.
परतवाड्यात मोक्याच्या जागी घर भाड्याने मिळावे, याकरिता इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घर शोधण्यासाठी कामाला लावले असल्याचे दिसून येते. अमरावती मार्गालगतच्या विदर्भ मिल परिसरात भाड्याने घर मिळाल्यास ते त्वरित बुकिंग करण्याचा सल्लादेखील नेत्यांचा आहे. अचलपूर मतदारसंघावर बाहेरील उमेदवारांचा डोळा असल्याने या इच्छुक उमेदवारांनीसुध्दा परतवाडा येथे घर भाड्याने घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे भविष्यात पक्षाकडे तिकीट मागण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत स्थानिक व बाहेरील उमेदवार हा वाद कायम चर्चिला जाणार आहे. काही जणांनी समाजाची व्होट बँक लक्षात घेता निवडणुकीत उतरण्याची तयारी चालविली आहे. विदर्भ मिलच्या चौधरीनगर परिसरात इच्छुक उमेदवारांनी घर भाड्याने शोधण्याची शोधमोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे विदर्भ मिल परिसरात घर भाड्याचे दर वाढविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Finding the desired candidates for returning home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.