अखेर बालगृहातील मतिमंद मुलगा मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:35+5:302021-09-27T04:14:35+5:30

परतवाडा : वझ्झर येथील मतिमंद मूकबधिर बालगृहातून कुणालाही न सांगता निघून गेलेला बाळू (२९) नामक मतिमंद मुलगा अखेर २८ ...

Finally got a mentally retarded boy in the nursery | अखेर बालगृहातील मतिमंद मुलगा मिळाला

अखेर बालगृहातील मतिमंद मुलगा मिळाला

परतवाडा : वझ्झर येथील मतिमंद मूकबधिर बालगृहातून कुणालाही न सांगता निघून गेलेला बाळू (२९) नामक मतिमंद मुलगा अखेर २८ तासांनंतर मिळाला.

मुंबई येथून आश्रमात संगोपनासाठी दाखल करण्यात आलेला व तेथेच लहानाचा मोठा झालेला बाळू हा बालगृहातून २५ सप्टेंबरला सकाळी ४ पासून कुणालाही न सांगता गायब झाला होता. बालगृहाकडून त्याचा शोध घेतला गेला. पण, तो आढळून आला नाही. यावरून तो हरवल्याची तक्रार परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही माहिती अचलपूर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर त्याच्या छायाचित्रासह टाकली गेली. सोशल मीडियावरून माहिती मिळताच अनेकांनी बाळूचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, बाळू २६ सप्टेंबरला सकाळी मिळाला. बाळू मिळाल्याची नोंद पोलीस ठाण्यात दुपारनंतर घेतली गेली.

बाळू अचानक निघून गेल्यामुळे बालगृहातील अनेक अनाथ मतिमंद मुलांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या मनाला हुरहुर लागली होती. पण, २६ सप्टेंबरला तोच बाळू परत त्यांच्यामध्ये पोहोचता झाल्यामुळे समाधान व्यक्त केले गेले.

Web Title: Finally got a mentally retarded boy in the nursery