अखेर सुटीच्या दिवशी दिले निवडणूक चिन्ह
By Admin | Updated: July 19, 2015 00:06 IST2015-07-19T00:06:39+5:302015-07-19T00:06:39+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुुकीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून उमेदवार असलेले कुलदीप काळपांडे यांना...

अखेर सुटीच्या दिवशी दिले निवडणूक चिन्ह
न्यायालयाचा निर्णय : अचलपूर बाजार समिती
अचलपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुुकीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून उमेदवार असलेले कुलदीप काळपांडे यांना अखेर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी चिन्हे दिले. ग्रामपंचायत आर्थिक दुुर्बल घटक मतदार संघातून काळपांडे यांचा उमेदवारी अर्ज येथील निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधकांनी शेतकरी नसल्याच्या कारणावरुन रद्द ठरविला होता. त्याविरुध्द काळपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने १४ जुलै रोजी निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली होती. यावर निवडणूक निर्णय अधिकारी राजेश भुयार यांनी नकार दिला होता. दरम्यान २० जुलै रोजी निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय नागपूर खंडपिठाने दिला.
सुटीच्या दिवशी
उघडले कार्यालय
बाजार समिती निवडणुकीचे कामकाज सुटीच्या दिवशी बंद असताना शनिवारी मात्र कुलदीप काळपांडे यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी चिन्हाची मागणी करणारे पत्र दिले होते.