शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधीश ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे रवाना

By गणेश वासनिक | Updated: June 27, 2025 14:24 IST

बेलोरा विमानतळावरील ‘एटीसी’कडून ‘होल्ड’: दृश्यमानता अयोग्य असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बुधवारी अमरावतीत जाहीर सत्कार सोहळा पार पडला. गुरुवारी ते संभाजीनगरकडे जाण्याच्या तयारीत असताना ढगाळ वातावरण, पाऊस आणि दृश्यमानता अयोग्य असल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाचे ‘टेक ऑफ’ करण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, हीच स्थिती कायम असल्यास चारचाकी वाहनाने संभाजीनगर गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुपारी १ ते ३ वाजताच्या सुमारास प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. सरन्यायाधीशांना संभाजीनगरकडे पाठविण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहने इंधनासह सुसज्ज़ केली होती. परंतु, तीन वाजता बेलोरा विमानतळ एटीसीकडून विमानाचे ‘टेक ऑफ’ करता येईल, असा निरोप आला अन् प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

दुपारी चार वाजताच्या सुमारास सरन्यायाधीश भूषण गवई हे पत्नी डॉ. तेजस्विनी, पुत्र जोतिरादित्य यांच्यासह ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे सत्कार सोहळ्यासाठी रवाना झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

"ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ‘एटीसी’ने विमानाच्या ‘टेक ऑफ’ला असमर्थता दर्शविली. मात्र, दुपारी तीन वाजताच्या सुमारास ‘एटीसी’ने परवानगी दिली. त्यानंतर सरन्यायाधीश दुपारी चार वाजता संभाजीनगरकडे रवाना झाले. थोडीफार धावपळ झाली, पण हे रूटीन काम आहे."- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती