अंजनगावात ‘एक बारी लय भारी’ चे चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:45+5:302020-12-16T04:29:45+5:30
पान ३ अंजनगाव सुर्जी : स्थानिक रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स येथे डीएमपी फिल्म प्रॉडक्शनच्या ‘एक बारी लय भारी’ या लघुचित्रपटाचे ...

अंजनगावात ‘एक बारी लय भारी’ चे चित्रीकरण
पान ३
अंजनगाव सुर्जी : स्थानिक रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स येथे डीएमपी फिल्म प्रॉडक्शनच्या ‘एक बारी लय भारी’ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. चित्रीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, सुखदेव भावे, दिनेश भोंडे, मनोहर मुरकुटे, मनोहर भावे, गणेश बोडखे उपस्थित होते. हा लघुपट शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असून, आजच्या परिस्थितीत त्यांच्या स्थितीवर हा चित्रपट बेतला आहे. हा लघुचित्रपट यू-ट्यूबवर प्रदर्शित होणार असल्याचे लेखक मनोहर पाटील यांनी सांगितले.
अंजनगाव सुर्जी, वडाळी, अडगाव खाडे, खोडगाव रोड, गरजधरी व चिखलदरा येथे चित्रीकरण झाले. या लघुचित्रपटामध्ये ईश्वर व तृप्ती बारी यांची प्रमुख भूमिका आहे. सहकलाकार म्हणून प्रवीण मानकर, निळकंठ महल्ले, दिनेश धाकतोडे , दिनेश भोंडे, नितीन ढगे, सुरेखा बारी, अजय शर्मा, गोपाल थोरात, सोपान रेखाते, मोहन अंबाडकर, अक्षय लाड, बाल कलाकार कृष्णा पोटे यांच्या भूमिका आहेत.
--------------