शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख पशुधनाला वैरण, पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: March 8, 2015 00:06 IST

जनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे.

गजानन मोहोड अमरावतीजनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत, अशी वैरण साठवण होण्याची सुतराम शक्यता नाही. वैरण पाणीटंचाईची झळ जाणवू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. पावसाअभावी खरीप २०१५ चा हंगाम उद्ध्वस्त झाला. जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करण्यात आला. अपुऱ्या व खंडित पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडू लागले. प्रकल्पातील पाणी पिण्यास गुरांना मनाई आहे. वैरणाची भीषण टंचाई आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन न देणारी जनावरे शेतकऱ्यांना कत्तलखान्याकडे मार्गस्थ करण्याचा निरुपाय झाला आहे. खरीप २०१५च्या हंगामात पेरणीपासून पावसाने दडी मारली. पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी आज जनावरांना वैरण उपलब्ध नाही. पाऊस कमी, जमिनीत पाण्याची कमतरता. यामुळे नदी-नाले कोरडे पडले. पाणी प्रवाहित नसल्यामुळे तुंबलेल्या पाण्यात 'जलपर्णी' वाढून गटारे निर्माण झालीत. हे पाणी जनावरांना पिण्यास अयोग्य आहे. पशुधन पाळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी ते विक्रीला काढली आहे. त्यामुळे जनावरे बेभाव खरेदी करणे सुरू केले आहे. १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात पाच वर्षांच्या तुलनेत बैलांची संख्या १४ हजार २५ इतकी कमी झाली. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ६.३ टक्के आहे. वैरणटंचाई, वाढती मजुरी, वर्षाकाठी लाखावर पोहचलेला घरगड्याचा महिना, हीदेखील त्यामागील कारणे आहेत. दुधाळू जनावारांच्या संख्येत मात्र दखलनीय वाढ झाली आहे.