जिल्हा बॅंकेतील अपहार प्रकरणात ‘से’ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:58+5:302021-07-07T04:14:58+5:30
सुमारे ७०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीपोटी ३.३९ कोटी रुपये दलाली देण्यात आली. त्यात जिल्हा बॅंकेची आर्थिक फसवणूक झाली. अशी ...

जिल्हा बॅंकेतील अपहार प्रकरणात ‘से’ दाखल
सुमारे ७०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीपोटी ३.३९ कोटी रुपये दलाली देण्यात आली. त्यात जिल्हा बॅंकेची आर्थिक फसवणूक झाली. अशी तक्रार बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी संदीप जाधव यांनी शहर कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. बॅंकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, चार अन्य अधिकारी, कर्मचारी व सहा ब्रोकर्सविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १७ जुन रोजी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेत जाऊन अनुषंगिक दस्तावेज ताब्यात घेतल्याने ११ पैकी सात जणांनी अटकपुर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. पैकी राजेंद्र गांधी, निता गांधी, पुरूषोत्तम रेड्डी शिवकुमार गट्टाणी यांच्या अटकपुर्व जामीनावर सोमवारी सुनावणी झाली. तर उर्वरित तिघांबाबतची सुनावणी मंगळवारी होणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी दिली.
सुनावणीनंतर अटकसत्र
याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरिक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात केला जात आहे. जे सात आरोपी अटकपुर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयात गेले, त्यांच्या सुनावणीनंतर अटकसत्र सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.