वाहन चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:35 IST2020-12-04T04:35:27+5:302020-12-04T04:35:27+5:30
नांदगाव पेठ : आरोपीने आपले चारचाकी वाहन विरुद्ध दिशेने चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका कारचालकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलिसांनी ...

वाहन चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव पेठ : आरोपीने आपले चारचाकी वाहन विरुद्ध दिशेने चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका कारचालकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई बुधवारी नांदगाव पेठ बसस्थानकावर करण्यात आली. एम.एच २२ एएम ३३०७ च्या चालकावर भादंविचे कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
---------------------------------
सार्वजनिक वाहतुकीस अडथळा
भातकुली : काळी-पिवळी वाहन सार्वजनिक रस्त्यावर उभे करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहनचालक गजानन मधुकर निंभोरकर(४०, रा. सायत)विरुद्ध भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. ही कारवाई हरताळा फाट्यावर बुधवारी करण्यात आली.
-------------------
संचारबंदीचे उल्लंघन, गुन्हा दाखल
अमरावती : रात्री ११ वाजतानंतर हॉटेल उघडे ठेवून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बडनेरा मार्गावरील हॉटेल सोशल स्क्वेअरच्या संचालकाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. विनोद श्यामलाल भोजवानी (४२) असे आरोपीचे नाव आहे.