शॉर्ट सर्कीटमुळे शेतात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:02+5:302021-03-31T04:13:02+5:30

संत्राझाडांसह गहू जळून खाक : मांगोना येथील घटना वरूड : तालुक्यातील बेनोडा येथील शेतकरी भूपेश रामधनजी शर्मा यांच्या मांगोना ...

Field fire due to short circuit | शॉर्ट सर्कीटमुळे शेतात आग

शॉर्ट सर्कीटमुळे शेतात आग

संत्राझाडांसह गहू जळून खाक : मांगोना येथील घटना

वरूड : तालुक्यातील बेनोडा येथील शेतकरी भूपेश रामधनजी शर्मा यांच्या मांगोना शिवारातील शेतात शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली. यामध्ये संत्राझाडांसह गहू जळून खाक झाला. एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २९ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.

बेनोडा येथील शेतकरी भूपेश शर्मा यांचे मौजा मांगोना येथे शेत आहे. शेतात संत्राझाडे असून गव्हाचे पीक आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्कीट होऊन दीड एकरातील आंबिया बहर धरलेली संत्र्याची १६५ झाडे आणि गहू जळून खाक झाला. महावितरण लोंबकळलेल्या तारांची देखभाल दुरस्ती करीत नसल्याने अशाया घटना होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा शेतकरी भूपेश शर्मा यांनी केला. त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Web Title: Field fire due to short circuit