आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची न्यायासाठी फरफट
By Admin | Updated: July 30, 2014 23:48 IST2014-07-30T23:48:38+5:302014-07-30T23:48:38+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील आठ वर्षांपासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पूर्ण न केल्यामुळे न्यायासाठी मागील आठ वर्षांपासून त्यांची फरफट

आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची न्यायासाठी फरफट
मोहन राऊत - धामणगाव (रेल्वे)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील आठ वर्षांपासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पूर्ण न केल्यामुळे न्यायासाठी मागील आठ वर्षांपासून त्यांची फरफट सुरूच आहे़
राज्यात सन २००५ या वर्षांत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले़ त्याकाळात आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स, कार्यक्रम अधिकारी, डाटा आॅपरेटर, समन्वयक, लेखापाल अशी पदे भरण्यात आली होती़ या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघाला. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांना अधिक पद्धतीने आरोग्याच्या सेवा मिळू लागल्या. आठ वर्षांपासून कंत्राटी सेवा देत असल्याने शासकीय सेवेत रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील आठ वर्षांत सात वेळा आंदोलने केली़
तत्कालीन आयुक्तांनी फिरविला शब्द
कंत्राटी कर्मचाऱ्यांना खासगी करणाबाबत आयपीएचएसमधील कर्मचारी तसेच जेएसएसके अंतर्गत कार्यरत कर्मचारी वगळता इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचे खासगीकरण केले जाणार नाही़ तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार नवीन निर्माण होणाऱ्या जागांकरिता एनआरएचएममधील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येईल, असा शब्द तत्कालीन आयुक्त विकास खारंगे यांनी गतवर्षी २६ जुलै रोजी झालेल्या सभेत दिला होता़ परंतु याच कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ विशेषत: पाच महिन्यांचा कालावधी उलटूनसुध्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचे शासकीय सेवेत मागील एका वर्षात सामायोजन केले नाही़ पासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पुर्ण न केल्यामुळे न्यायासाठी त्यांची फरफट सुरूच आहे़